नशीबच फुटकं! खराब अंपायरिंगचा रोहित शर्मा शिकार, 2 अंपायरमध्ये निर्णयावरून....

अरेरे! यांच्यातच ताळमेळ नाही तिथे बाकीच्यांचं काय? आता हे फोटो पाहून तुम्हीच ठरवा रोहित शर्मा OUT की NOT OUT 

Updated: May 10, 2022, 10:03 AM IST
नशीबच फुटकं! खराब अंपायरिंगचा रोहित शर्मा शिकार, 2 अंपायरमध्ये निर्णयावरून....  title=

मुंबई : यंदाच्या आयपीएलमध्ये खराब अंपायरिंगवरून मैदानात खूप जास्त राडे झाल्याचं पाहायला मिळालं. कोलकाता विरुद्ध मुंबई झालेल्या सामन्यात रोहित शर्माला याच गोष्टीमुळे मनस्ताप झाला. खराब अंपायरिंगचा शिकार व्हावं लागलं. मैदानातील अंपायर आणि थर्ड अंपायरचा निर्णय वेगवेगळा आला. 

रोहित शर्मासाठी दिलेल्या निर्णयानंतर सोशल मीडियावर क्रिकेटप्रेमींनी संताप व्यक्त केला आहे. अंपायर पुन्हा एकदा ट्रोलर्सच्या निशाण्यावर आहे. कोलकाता विरुद्धच्या सामन्यात टिम साउदी बॉलिंग करत होता. 

ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर रोहित शर्माने लेग साइड डिफेंड करण्याचा प्रयत्न केला. यावेळी रोहितच्या पायाला बॉल लागला आणि विकेटकीपरच्या हातात बॉल आला. जॅक्सनने आऊट असल्याचं सांगितलं मात्र मैदानावरील अंपायरने आऊट दिलं नाही. 

कोलकाताचा कर्णधार श्रेयस अय्यरने थर्ड अंपायरचा निर्णय घेतला. यावर थर्ड अंपायरने रोहित शर्माला आऊट निर्णय दिला. या दोन वेगवेगळ्या निर्णयामुळे क्रिकेटप्रेमींचा संताप अनावर झाला आणि खराब अंपायरिंगवरून ट्रोल करण्यात आलं. 

कोलकाता टीमने मुंबईचा 51 धावांनी पराभव केला. कोलकाताने पहिल्यांदा बॅटिंग करून 166 धावांचं आव्हान ठेवलं. मात्र मुंबईला 133 धावा करण्यात यश आलं. कोलकाताच्या बॉलर्सनी उत्तम कामगिरी करून 113 धावांना मुंबईला रोखलं.