अन् उत्साहाच्या भरात रोहित शर्मा गणतीच विसरला...

तुफान फटकेबाजीसाठी प्रसिद्ध असलेला भारतीय क्रिकेटर म्हणजे रोहित शर्मा.

Updated: Oct 3, 2017, 07:22 PM IST
अन् उत्साहाच्या भरात रोहित शर्मा गणतीच विसरला... title=

मुंबई : तुफान फटकेबाजीसाठी प्रसिद्ध असलेला भारतीय क्रिकेटर म्हणजे रोहित शर्मा.

वन डेमध्ये डबल सेंच्युरी मारण्याचा विक्रम रोहितच्या नावावर आहे. रोहित जसा क्रिकेटच्या पीचवर तुफान बॅटींग करतो तसाच तो सोशल मीडियामध्येही हीट आहे.

रोहितच्या ट्विटर अकाऊंटवर त्याने ८० लाख फॉलोवर्सचा टप्पा गाठला आहे. रोहितने हा आनंद त्याच्या फॅनसोबतही शेअर केला. मात्र आनंदाच्या भरात रोहितने एक चूक केली आणि तो ट्विटरवर ट्रोल झाला. 

 

रोहितने चाहत्यांना धन्यवाद देताना ८० लाख ही किंमत फळ्यावर लिहली. त्यापुढे त्याने M लिहले.  याचा अर्थ ८० लाख मिलियन असा होतो.  नकळत आणि उत्साहाच्या भरात ही संख्या मोठी झाल्याचे रोहितच्याही लक्षात आले नाही. पण हुशार युजर्सनी रोहितला ही चूक दाखवून दिली. तसेच गणित सुधारण्याचा सल्लादेखील दिला.