बॉलिंग घ्यायची होती की बॅटींग? टॉस जिंकल्यानंतर गोंधळला कर्णधार रोहित शर्मा, डोकं पकडलं आणि...!

यावेळी टॉस दरम्यान एक अशी घटना घडली ज्यामध्ये टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा कन्फ्यूज झाल्याचं दिसून आलं.

Updated: Jan 21, 2023, 02:33 PM IST
बॉलिंग घ्यायची होती की बॅटींग? टॉस जिंकल्यानंतर गोंधळला कर्णधार रोहित शर्मा, डोकं पकडलं आणि...! title=

Rohit Sharma hilariously forgets his decision at toss : भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यामध्ये तीन वनडे सामन्यांची सिरीज खेळवली जातेय. यामधील दुसरा सामना आज रायपूरमध्ये खेळवला जातोय. शहीद वीर नारायण सिंह क्रिकेट स्टेडियममध्ये हा सामना खेळवला जात असून टीम इंडियाने (Team India) प्रथम गोलंदाजी करत चांगली सुरुवात केलीये. मात्र यावेळी टॉस दरम्यान एक अशी घटना घडली ज्यामध्ये टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा कन्फ्यूज झाल्याचं दिसून आलं.

दुसरा सामना सुरु होण्यापूर्वी दोन्ही टीम्सच्या कर्णधारांना टॉससाठी बोलवण्यात आलं होतं. यावेळी टीम इंडियाने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र गोलंदाजीचा निर्णय घेताना रोहित शर्मा काहीसा कन्फ्यूज झालेला दिसला. प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय सांगण्यासाठी त्याने काहीसा वेळ घेतला. दरम्यान त्याचा हाच व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसतोय.

टॉस जिंकल्यानंतर 20 सेकंदांनी सांगितला निर्णय 

रायपूरच्या शहीद वीर नारायण सिंह आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये दुसरा वनडे सामना खेळवण्यात येतोय. जर भारताने हा सामना जिंकला तर सिरीजमध्ये 2-0 ने आघाडी घेईल. मात्र सामन्यापूर्वी टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा खूप कन्फ्यूज दिसला.

टॉसदरम्यान कर्णधार रोहित शर्माने नाणं उडवलं, यावेळी  टॉम लेथम ने हेडचा कॉल दिला आणि टेल आल्याने तो टॉस हरला. अशावेळी टॉस जिंकल्याने रोहित शर्माला प्रथम निर्णय विचारण्यात आला होती. मात्र यावेळी त्याने निर्णय सांगण्यासाठी तब्बल 20 मिनिटं घेतली आणि आपला निर्णय घेतला. गोलंदाजीचा निर्णय सांगण्यासाठी रोहितने इतका वेळ घेतला की टॉम आणि तिथे उपस्थित रवी शास्त्री जोरजोरात हसत होते.

कन्फ्यूज झाल्यानंतर रोहित शर्मा म्हणाला, "मी विसरून गेले होतो, टॉस जिंकल्यानंतर मला नेमकी कशाची निवड करायची आहे. कारण यावर भरपूर चर्चा केली होती." दरम्यान या वरून रोहित शर्माला सोशल मीडियावर चांगलंच ट्रोल करण्यात आलं आहे.