Rohit Sharma: रोहित शर्माचा वेंधळेपणा पुन्हा आला समोर? दुसऱ्या टीमच्या बसमध्ये चढला हिटमॅन, Video Viral

Rohit Sharma: इंडियन्स प्रिमीयर लीगबाबत ( IPL 2024 ) एक खास जाहिरात तयार करण्यात आली आहे. ज्यामध्ये स्टार खेळाडू एकमेकांना आव्हान देताना दिसतेय. यामध्ये अभिनेता सुनील शेट्टीने त्याचा जावई केएल राहुलला नव्हे तर मुंबई इंडियन्सला सपोर्ट करताना दिसतायत. 

सुरभि जगदीश | Updated: Mar 15, 2024, 05:53 PM IST
Rohit Sharma: रोहित शर्माचा वेंधळेपणा पुन्हा आला समोर? दुसऱ्या टीमच्या बसमध्ये चढला हिटमॅन, Video Viral title=

Rohit Sharma: आयपीएल सुरु होण्यासाठी आता अवघे काही दिवस शिल्लक आहेत. अशामध्ये आता सर्व टीम्सने प्रॅक्टिसला सुरुवातही केली आहे. यावेळी जे खेळाडू एकत्र खेळत होते, ते आता एकमेकांविरोधात खेळताना दिसणार आहेत. दरम्यान या लीगसाठी एक खास जाहिरात तयार करण्यात आली आहे. यावेळी रोहित शर्मा ( Rohit Sharma ) पुन्हा एकदा वेंधळेपणा करताना दिसतोय. इतकंच नाही तर खेळाडू एकमेकांना चॅलेंज करताना दिसतायत. 

इंडियन्स प्रिमीयर लीगबाबत ( IPL 2024 ) एक खास जाहिरात तयार करण्यात आली आहे. ज्यामध्ये स्टार खेळाडू एकमेकांना आव्हान देताना दिसतेय. यामध्ये अभिनेता सुनील शेट्टीने त्याचा जावई केएल राहुलला नव्हे तर मुंबई इंडियन्सला सपोर्ट करताना दिसतायत. याशिवाय जवळचे मित्र मानले जाणारे रोहित शर्मा आणि ऋषभ पंत एकमेकांना आव्हान देताना दिसले. यावेळी रोहित शर्मा ( Rohit Sharma ) चुकीच्या बसमध्ये चढताना दिसतोय.

चुकीच्या टीमच्या बसमध्ये चढला रोहित?

या व्हिडीओची सुरूवात रोहित शर्मा ( Rohit Sharma ) बसमध्ये चढतानापासून होतेय. रोहित बसमध्ये चढत असताना ऋषभ पंत त्याला अडवतो. यावेळी पंत रोहितला तो चुकीच्या बसमध्ये चढत असल्याचं सांगतोय. यानंतर या जाहिरातीत अनेक खेळाडूंसोबतचे मजेशीर किस्से दाखवलेत. मात्र यावेळी रोहित चुकीच्या बसमध्ये चढत असल्याने त्याचा हा वेंधळेपणा पाहून चाहत्यांना हा व्हिडीओ प्रचंड आवडला आहे.  

रोहित शर्माने ( Rohit Sharma ) त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून जाहिरातीचा व्हिडिओ शेअर केला आहे. ऋषभ पंतसोबत त्याची शाब्दिक मजेशीर बाचाबाची या व्हिडिओत दिसत आहे. लीगमध्ये प्रवेश करताच भाईचारा संपलाय, असं पंत म्हणतोय. रोहितने व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, 'तू नियम बनवत राहा रिशु, आम्ही टेबलवर राज्य करू. याशिवा. सुनील शेट्टी आणि मी आमचा संघ निवडायला सुरुवात केली आहे, आता तुमची पाळी आहे.'' असं कॅप्शन रोहितने व्हिडिओला दिलंय.

सुनील शेट्टींची मुंबई इंडियन्सला साथ

या जाहिरातीत केकेआरचा कर्णधार श्रेयस अय्यर सुनील शेट्टी यांची भेट घेताना दिसतोय. यावेळी सुनील शेट्टीला त्याला म्हणतात की, ते मुंबई इंडियन्सचे चाहते आहेत. सुनील शेट्टींची मुलगी अथिया ही केएल राहुलची पत्नी आहे. राहुल हा लखनऊ सुपर जायंट्सचा कर्णधार आहे. मात्र, सुनील शेट्टी केएल राहुलला नव्हे तर रोहित शर्माच्या ( Rohit Sharma ) टीमला सपोर्ट करताना दिसतायत.