Rohit Sharma: रविवारी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर गुजरात टायटन्स विरूद्ध मुंबई इंडियन्स यांच्यात सामना रंगला होता. या सामन्यात गुजरात टायटन्सने मुंबई इंडियन्सचा पराभव केला आहे. अवघ्या 6 रन्सने मुंबई इंडियन्सला पहिल्याच सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला होता. रोहितनंतर हार्दिक कर्णधारपद भूषवण्याची ही पहिलीच मॅच होती. चाहत्यांच्या म्हणण्यानुसार, हार्दिकने लाईव्ह सामन्यात अपमानास्पद वागणूक देण्यात आली. अशातच सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत असून त्यामध्ये रोहित आणि जसप्रीत बुमराह हार्दिक पंड्याशी नाराज असल्याचं स्पष्टपणे दिसून येतंय.
मुंबई इंडियन्सची टीम हार्दिकच्या नेतृत्वाखाली पहिल्यांदाच मैदानात उतरली होती. गुजरातची फलंदाजी सुरु असताना . सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये रोहित आणि बुमराह हार्दिकवर एका गोष्टीवरून नाराज असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे.
झालं असं की, गुजरात टायटन्स फलंदाजी करत असताना ओव्हर टाकण्यावेळी बुमराह हार्दिकशी काहीतरी चर्चा करत होता. काही मिनिटांत रोहित शर्माही सहभागी होताना दिसला. रोहित येताच पंड्या काहीतरी बोलून परत जाऊ लागला. मग रोहितच्या हावभावांवरून असं लक्षात आलं की, बुमराहकडे याची तक्रार करत होता. यावेळी तो रोहित हार्दिककडे बोट दाखवतो आणि काहीतरी बोलतो. यावरून एकंदरीत बुमराह आणि रोहित यांचं हार्दिक पंड्याशी काहीसा वाद झाल्याचं दिसून आलं.
दरम्यान या तिघांमध्ये झालेली चर्चा स्टंप माईकपासून दूर झाल्याने, नेमकं काय झालंय हे कळू शकलेलं नाही. मात्र पण व्हिज्युअल पाहता हे स्पष्ट आहे की, एमआयचे हे तीन खेळाजू कोणत्या ना कोणत्या मुद्द्यावरून भांडत होते. या वादानंतर हार्दिक पंड्याने रोहित शर्माला मैदानात इकडे-तिकडे फिरायला लावलं.
गुजरात विरूद्ध मुंबई मॅचमध्ये असे काही सीन्स पाहायला मिळाले, जे पाहून रोहित शर्माचे चाहते चांगलेच संतापले आहेत. सामन्यादरम्यानचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये हार्दिक मुंबईचा माजी कर्णधार रोहित शर्माला फिल्डींगच्या वेळी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सतत पळवताना दिसतोय. व्हिडिओमध्ये पहिलं तर रोहित शर्मा दुसऱ्या फिल्डिंग पोझिशनवर धावताना दिसतोय. यावेळी रोहित त्याच्या स्थानावर पोहोचतो, मात्र लगेच हार्दिक त्याला जागा बदलण्यास सांगतो. यावेळी रोहित शर्मा पंड्या सांगत असलेल्या दुसऱ्या स्थानावर जातो.