Rohit Sharma Records, Asia Cup 2023 : टीम इंडियाचा ( Team India ) कर्णधार रोहित शर्माने ( Rohit Sharma ) नेपाळविरूद्धच्या सामन्यात उत्तम कामगिरी केली. यावेळी रोहितने 59 बॉल्समध्ये नाबाद 74 रन्सची कामगिरी केली. त्याच्या या खेळीमध्ये 6 फोर आणि 5 सिक्सेसचा समावेश होता. त्याच्या या उत्तम खेळीनंतर त्याला मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड देखील देण्यात आला. दरम्यान केवळ मॅन ऑफ द मॅच नाही तर रोहितने ( Rohit Sharma ) अनेक मोठे विक्रम देखील आपल्या नावे केले आहेत.
आशिया कपमध्ये (ODI आणि T-20) सर्वाधिक रन्स करण्याच्या बाबतीत रोहित ( Rohit Sharma ) दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. नेपाळविरूद्धच्या खेळीनंतर त्याने 33 सामन्यांमध्ये 1101 रन्स केले आहेत. या यादीत त्याने कुमार संगकारा आणि विराट कोहली यांना मागे टाकलंय. तर या यादीमध्ये सनथ जयसूर्या पहिल्या क्रमांकावर आहे. जयसूर्याच्या नावे 1220 रन्सची नोंद आहे.
सर्वाधिक रन्सनंतर रोहित शर्माने ( Rohit Sharma ) क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरलाही ( Sachin Tendulkar ) एका विक्रमामध्ये पछाडलं आहे. एशिया कपमध्ये भारतीय खेळाडू म्हणून रोहित सर्वाधिक 50 पेक्षा जास्त स्कोअर करण्याच्या बाबतीत पहिल्या स्थानावर पोहोचला आहे. या स्पर्धेच्या इतिहासातील रोहितचं ( Rohit Sharma ) हा दहावा अर्धशतकापेक्षा अधिक स्कोअर आहे. सचिन तेंडुलकर (9 वेळा) दुसऱ्या तर विराट कोहली (8 वेळा) तिसऱ्या स्थानावर आहे.
नेपाळविरूद्धच्या सामन्यानंतर रोहित शर्माने ( Rohit Sharma ) अजून एक रेकॉर्ड केला आहे. यामध्ये वनडे एशिया कपमध्ये सर्वाधिक सिक्सेस लगावणारा रोहित पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. आतापर्यंत रोहितने एकूण 22 सिक्सेस लगावले आहे. यावेळी त्याने टीम इंडियाचा ( Team India ) माजी खेळाडू सुरेश रैनाला मागे सोडलंय. रैनाच्या नावे 18 सिक्सेसची नोंद आहे.