‘टेस्ट बॅटिंग अवॉर्ड’वर पंतने कोरलं नावं; कोहली-रोहितच्या पदरी निराशा

 'कॅप्टन ऑफ द इअर'चा पुरस्कार न्यूझीलंडच्या केन विलियम्सनला देण्यात आलेला आहे.

Updated: Feb 11, 2022, 09:14 AM IST
‘टेस्ट बॅटिंग अवॉर्ड’वर पंतने कोरलं नावं; कोहली-रोहितच्या पदरी निराशा title=

मुंबई : ईएसपीएन क्रिकइंफोच्या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. या पुरस्कारांमध्ये ‘टेस्ट बॅटिंग अवॉर्ड’ भारताचा धडकेबाज फलंदाज आणि विकटेकीपर ऋषभ पंतला जाहीर झाला आहे. गेल्या वर्षी ब्रिस्बेनमध्ये ऑस्ट्रेलियाविरूद्ध खेळलेल्या 89 रनच्या खेळीमुळे त्याला हा अवॉर्ड देण्यात आला आहे. तर 'कॅप्टन ऑफ द इअर'चा पुरस्कार न्यूझीलंडच्या केन विलियम्सनला देण्यात आलेला आहे.

ऋषभ पंतने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या अंतिम कसोटीच्या शेवटच्या क्षणीमध्ये भारताला अशक्यप्राय विजय मिळवून दिला होता. यानंतर टीम इंडियाने या मालिकेत 2-1 असा शानदार विजय नोंदवला. भारत हा सामना जिंकेल अशी कोणालाच अपेक्षा नव्हती. त्यावेळी टीमचे अनेक बडे खेळाडू दुखापतीने ग्रस्त होते.  

दुसरीकडे विलिम्सनला या पुरस्कारासाठी विराट कोहली, बाबर आझम आणि अॅरॉन फिंचचं यांचं आव्हान होतं. पण न्यूझीलंड क्रिकेट टीमला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप आणि नंतर T20 वर्ल्ड कपमध्ये उपविजेतेपद मिळवून देण्यासाठी त्याला हा पुरस्कार त्याच्या नावे करण्यात आला आहे.

‘टेस्ट बॉलिंग’ म्हणजे सर्वोत्कृष्ट टेस्ट गोलंदाज म्हणून न्यूझीलंडच्या काइल जेमिसनची वर्णी लागली आहे. जेमिसनच्या मदतीने न्यूझीलंड पहिल्यांदा जागतिक कसोटी विजेता ठरला. त्यानेने अंतिम सामन्यात 31 रन्समध्ये पाच विकेट्स घेतले होते.

तर इंग्लंडचा वेगवान गोलंदाज ऑली रॉबिन्सनला आठ टेस्ट सामन्यामध्ये 37 विकेट्स घेतल्याबद्दल 'डेब्युटंट ऑफ द इयर' अवॉर्ड मिळालाय. रॉबिन्सन 2021 मध्ये कसोटीत देशाचा दुसरा सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज ठरलाय.