ऋषभ पंत बनला दिल्लीचा डेविलियर्स, विराट-रोहित-सेहवागला टाकले मागे

दिल्लीचा युवा फलंदाज ऋषभ पंतने गुरुवारी आयपीएल २०१८मध्ये आपले पहिले शतक ठोकले यासोबतच त्याने या लीगमधील १००० धावाही पूर्ण केल्या. 

Updated: May 11, 2018, 10:39 AM IST
 ऋषभ पंत बनला दिल्लीचा डेविलियर्स, विराट-रोहित-सेहवागला टाकले मागे title=

मुंबई : दिल्लीचा युवा फलंदाज ऋषभ पंतने गुरुवारी आयपीएल २०१८मध्ये आपले पहिले शतक ठोकले यासोबतच त्याने या लीगमधील १००० धावाही पूर्ण केल्या. पंतने फिरोजशहा कोटला मैदानावर खेळवणल्या आलेल्या ११व्या सीझनमधील सामन्यात हैदराबादविरुद्द त्याने १२८ धावांची दमदार खेळी केली. त्याने ६३ चेंडूत हे शतक ठोकले. यात त्याने १५ चौकार आणि सात षटकार ठोकले. ही त्याची आयपीएलमधील सर्वात मोठी खेळी आहे. याआधी त्याने गेल्या हंगामात गुजरात लायन्सविरुद्ध याच मैदानावर ९७ धावांची खेळी केली होती. 

या सामन्यात त्याने अनेक रेकॉर्डसही केले. सोशल मीडियावर तर ऋषभ पंतला भारताचा मिस्टर ३६० डिग्री बनवण्यात आलेय. मिस्टर ३६० हे दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज एबी डे विलियर्सला म्हटले जाते. डेविलियर्स कोणत्याही दिशेला कोणत्याही प्रकारचे फटके खेळतो. त्यामुळे त्याला मिस्टर ३६० असे म्हटले जाते. हैदराबादविरुद्ध पंतने ज्याप्रकारचे फटके खेळले त्यावरुन सोशल मीडियावर त्याला एबी डेविलियर्स म्हटले जातेय.  

पंतने शतक ठोकण्यासोबतच आयपीएलमध्ये एक हजार धावा पूर्ण करणारा कमी वयातील खेळाडू ठरलाय. याआधी हा रेकॉर्ड संजू सॅमसनच्या नावावर होता. संजूने २१ वर्ष आणि १८३ दिवस या वयात आयपीएलमध्ये हजार धावा पूर्ण केल्या होत्या. विराट कोहली(२२ वर्षे १७५ दिन), रोहित शर्मा (२२ वर्षे ३४० दिवस), सुरेश रैना (२३ वर्षे ११८ दिवस) आणि (श्रेयस अय्यर २३ वर्षे १४२ दिवस) मध्ये आपल्या १००० धावा पूर्ण केल्या होत्या.