Rishabh Pant : 'आयुष्यात पहिल्यांदा मला...', कार अपघातावर ऋषभ मनमोकळा बोलला, म्हणतो 'डॉक्टरांना जेव्हा विचारलं...'

Rishabh Pant News : अपघातात पंतच्या उजव्या गुडघ्याचा लिगामेंट फाटला होता. त्याचबरोबर उजव्या मनगटाला आणि पाठीला गंभीर दुखापत झाली होती. अशातच ऋषभने बोलताना अपघाताबद्दल भाष्य केलं आहे.

सौरभ तळेकर | Updated: Jan 30, 2024, 03:52 PM IST
Rishabh Pant : 'आयुष्यात पहिल्यांदा मला...', कार अपघातावर ऋषभ मनमोकळा बोलला, म्हणतो 'डॉक्टरांना जेव्हा विचारलं...' title=
Rishabh Pant Horrific Reaction Over car Accident

Rishabh Pant On Horrific Car Accident : एक वर्षापूर्वी म्हणजेच 30 डिसेंबर 2022 रोजी टीम इंडियाचा स्टार विकेटकीपर फलंदाज ऋषभ पंत (Rishabh Pant) याच्या कारला अपघात (Car Accident) झाला होता. दिल्लीहून घरी आईला भेटण्यासाठी जात असताना ऋषभची गाडी भरवेगात डिव्हायडरला ठोकली अन् गाडीचा भूगा झाला. या अपघातात ऋषभ देखील गंभीर जखमी झाला होता. त्यानंतर त्याच्यावर विविध शस्त्रक्रिया करण्यात आल्यात. या अपघातात पंतच्या उजव्या गुडघ्याचा लिगामेंट फाटला होता. त्याचबरोबर उजव्या मनगटाला आणि पाठीला गंभीर दुखापत झाली होती. अशातच ऋषभने बोलताना अपघाताबद्दल भाष्य केलं आहे.

काय म्हणाला ऋषभ पंत?

आयुष्यात पहिल्यांदाच मला वाटलं की आता माझी वेळ संपली आहे. अपघातावेळी झालेल्या दुखापतीची मला माहिती होती. परंतू मी काही अंशी नशिबवान होतो, असं म्हणावं लागेल. कारण दुखापती आणखी गंभीर असू शकल्या असत्या. मला वाटलं कोणतरी मला वाचवतंय. जेव्हा मी डॉक्टरांशी बोलत होतो, तेव्हा मी त्यांना विचारलं की मला बरं होण्यासाठी किती वेळ लागेल. तेव्हा त्यांनी 16 ते 18 महिन्यांचा कालावधी सांगितला. रिकव्हरी लवकर होण्यासाठी मला कठोर परिश्रम करावे लागतील, हे मला माहिती होतं, असं ऋषभ पंत सांगतो.

ऋषभ पंत आयपीएल खेळणार?

अपघातत जखमी झाल्याने ऋषभ गेल्या आयपीएलमध्ये खेळू शकला नव्हता. मात्र, दिल्ली कॅपिट्लसच्या टीमला सपोर्ट करण्यासाठी त्याने मैदानात हजेरी लावली होती. अशातच नुकत्याच झालेल्या आयपीएल लिलावात ऋषभ दिल्लीच्या मॅनेजमेंटसोबत दिसला होता. अशातच आता यंदाच्या हंगामात ऋषभ दिसेल की नाही? असा सवाल विचारला जातोय. यंदाच्या हंगामात ऋषभ पंत इम्पॅक्ट प्लेयर म्हणून खेळेल, अशी शक्यता वर्तविली जात आहे. 

दरम्यान, ऋषभ पंतने आतापर्यंत खेळलेल्या 33 कसोटी सामन्यांमध्ये 43.67 च्या सरासरीने 2271 धावा केल्या आहेत. ज्यामध्ये 5 धुंवाधार शतकं आणि 11 अर्धशतकांचा समावेश आहे. त्याने 66 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये तीन अर्धशतकांच्या मदतीने 987 धावा केल्या आहेत.