Rishabh Pant: IPL 2023 मध्ये न खेळताही ऋषभ पंतला मिळणार 21 कोटी, कसं ते जाणून घ्या

Rishabh Pant Health Updates: ऋषभ पंतवरच्या अपघातामुळे तो किमान 6 महिने मैदानापासून दूर राहणार आहे. त्यामुळे त्याला आयपीएल वेतन मिळणार की नाही, असा मुद्दा उपस्थित झाला आहे. 

Updated: Jan 9, 2023, 03:02 PM IST
Rishabh Pant: IPL 2023 मध्ये न खेळताही ऋषभ पंतला मिळणार 21 कोटी, कसं ते जाणून घ्या title=

Rishabh Pant : टीम इंडियाचा (Team India) स्टार फलंदाज ऋषभ पंतचा (Rishabh Pant) 30 डिसेंबर 2022 रोजी कारचा अपघात झाला होता. त्यानंतर त्याच्यावर मुंबईत लिगामेंटच्या दुखापतीवर शस्त्रक्रिया केली. या शस्त्रक्रियेनंतर पंतला मैदानात परतण्यासाठी 6 महिन्यांहून अधिक कालावधी लागू शकतो. म्हणजेच पंत 2023 च्या आयपीएलमध्ये खेळताना दिसणार नाही. मात्र चाहत्यांना एक प्रश्न पडला की, पंत जर आयपीएलमध्ये खेळणार नाही तरीही त्याला 16 कोटी रुपये मिळणार का?

BCCI पंतचे व्यावसायिक हितही जपणार

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात BCCI या  ऋषभ पंतच्या (Rishabh Pant) उपचाराचा सर्व खर्च उचलत नाही. तर त्याचे व्यावसायिक हितही जपण्याचा निर्णय घेतला आहे. पंत यंदा आयपीएलमध्ये खेळत नसला तरी, बीसीसीआय त्याचे आयपीएलचे 16 कोटी वेतन दिल्ली कॅपिटल्समधून पूर्ण करेल. दरम्यान पंत पुढील 6 महिने क्रिकेटपासून दूर राहणार आहे म्हणून केंद्रीय करारांतर्गत त्याला मिळालेल्या वार्षिक रिटेनरशिप फीसाठी बोर्ड 5 कोटी रुपये एकरकमी पेमेंट करणार आहे. 

BCCI आयपीएलचे संपूर्ण वेतन देणार

तसेच चाहत्यांना प्रश्न पडला की, पंतला दिल्ली कॅपिटल्सने 16 कोटी रुपयांना विकत घेतले आणि त्याला आयपीएल 2023 साठी कायम ठेवले असेल तर पंतचा आयपीएलचे वेतन बीसीसीआय का देईल? तर याचे कारण एक नियम आहे. सर्व केंद्रीय करारबद्ध खेळाडूंचा विमा दिला जातो. बीसीसीआयच्या नियमांनुसार या खेळाडूंना दुखापतीमुळे आयपीएलमधून बाहेर पडल्यास बोर्डाकडून त्यांना पूर्ण मोबदला दिला जातो. संबंधित फ्रँचायझी नाही, तर विमा कंपनी वेतने देते.

वाचां: एकदिवसीय मालिकेआधी टीम इंडियाला मोठा धक्का, हा प्रमुख खेळाडू संघाबाहेर 

ऋषभ पंतला BCCI ने 2021-22 हंगामासाठी केंद्रीय करार यादीच्या श्रेणी-A मध्ये स्थान दिले आहे. यामध्ये सहभागी खेळाडूंना वार्षिक रिटेनरशिप फी म्हणून 5 कोटी रुपये मिळतात. पंत दीर्घकाळ क्रिकेटपासून दूर राहणार आहे. अशा परिस्थितीत बीसीसीआयने त्याला ही रक्कम सरसकट देण्याचा निर्णय घेतला आहे. IPL 2022 च्या आधी दीपक चहरला दुखापत झाली होती. त्याला चेन्नई सुपरकिंग्सने 14 कोटींना विकत घेतले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, बीसीसीआयच्या नियमांनुसार त्याला पूर्ण पैसे मिळाले.

पंतच्या दुखापतीची खरी स्थिती काय आहे?

ऋषभचे ऑपरेशन मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात डॉ. दिनशॉ परडीवाला यांनी केले. त्याच्या गुडघ्याची शस्त्रक्रिया गुंतागुंतीची होती. कारण त्यात एसीएल आणि एमसीएल या दोन्ही अस्थिबंधनांच्या शस्त्रक्रियांचा समावेश होता. ACL हा एक अस्थिबंधन आहे जो मांडीच्या हाडांना शिनबोनशी जोडतो आणि गुडघ्याच्या सांध्याला स्थिर करण्यास मदत करतो. MCL वरच्या नडगीच्या हाडाच्या पृष्ठभागापासून खालच्या मांडीच्या हाडापर्यंत चालते. पंतला शस्त्रक्रियेतून बरे होण्यासाठी किमान ४ महिने आणि मॅच फिटनेस परत मिळण्यासाठी आणखी दोन महिने लागतील. म्हणजेच ६ महिन्यांपूर्वी तो मैदानात परतू शकणार नाही.