Rishabh Pant Car Accident : कार अपघातातून बचावला पंत; त्याच्यासाठी पाकिस्तानात कोण करतंय दुआ?

Rishabh Pant Car Accident CCTV Footage : 25 वर्षीय भारतीय क्रिकेटर ऋषभ पंतचा ( #RishabhPant) आज (30 डिसेंबर) पहाटे 5.30 वाजता अपघात झाला. त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे. त्यांची कार रेलिंगला धडकली आणि त्यानंतर तिला आग लागली. आईला सरप्राईज देण्यासाठी तो एकटाच घरी जात होता. 

Updated: Dec 30, 2022, 02:39 PM IST
Rishabh Pant Car Accident : कार अपघातातून बचावला पंत; त्याच्यासाठी पाकिस्तानात कोण करतंय दुआ? title=

Rishabh Pant Car Accident CCTV Footage : टीम इंडियाचा (team India) स्टार विकेटकीपर फलंदाज ऋषभ पंत (Rishabh Pant) याच्या कारला भीषण अपघात झाल्याची घटना घडली होती. रुरकीच्या नरसन सीमेवर हम्मादपूर गावाजवळ पंत यांची कार रेलिंगला जोरात धडकली होती आणि नंतर पेट घेतला होता. या भीषण अपघातात सुदैवाने ऋषभ पंत बचावला होता, मात्र तो गंभीर जखमी आहे. सध्या त्याच्यावर दिल्लीतील रुग्णालयात उपचार सुरु आहे. ऋषभ पंतच्या या अपघातानंतर आता क्रिकेट वर्तुळातून अनेक खेळाडूंनी लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना केली आहे. त्यात एका पाकिस्तानी खेळाडूने ऋषभ पंतसाठी (Rishabh Pant) दुआ मागितली आहे. या पाकिस्तानी (Pakistani Player) खेळाडूचे ट्विट चर्चेत आले आहे. 

पाकिस्तानी खेळाडूचे ट्विट 

पाकिस्तानला टीम इंडियाचा (Team India) कट्टर प्रतिस्पर्धी म्हणून नेहमीच पाहिले जाते. कारण दोघांमधील मैदानावरचे सामने नेहमीच हायव्होल्टेज असतात. मात्र कितीही कट्टर प्रतिस्पर्धी असले तरी अनेकदा अनेक विषयावर ते एकत्रीत येतानाही दिसतात. मग खेळभावना असो वा इतर काही. या घटनेत सुद्धा ऋषभ पंतच्या (Rishabh Pant) अपघातानंतर पाकिस्तानच्या खेळाडूने दुआ मागितली आहे.

पाकिस्तानचा अनुभवी गोलंदाज शाहिन शाह आफ्रिदीने (Shaheen Afridi)  ऋषभ पंत (Rishabh Pant) लवकर बरा व्हावा यासाठी अल्लाहकडे दुआ मागितली आहे. या संदर्भात त्याने ट्विट देखील केली आहे. हे त्याचे ट्विट चर्चेत आले आहे. तसेच आता पाकिस्तानी खेळाडूची दुआ कबूल व्हावी, अशी आशा भारतीय क्रिकेट फॅन्स करतायत. 

टीम इंडियाचा अनुभवी स्पिनर गोलंदान रविचंद्रन अश्विनने (Ravichandran Ashwin) देखील ऋषभ पंतसाठी ट्विट केले आहे. आपण सर्वजण त्याच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करूया,” असे अश्विनने ट्विटमध्ये म्हटले आहे.

टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने (Mohmmad shami) 'लवकर बरा हो ऋषभ पंत', अल्लाह सर्व ठिक करेल, असे त्याने ट्विटमध्ये म्हटलेय.

श्रीलंकेचा माजी क्रिकेटर लसिथ मलिंगाने देखील ऋषभ पंतसाठी प्रार्थना केली आहे.  ऋषभ पंत लवकर बरा व्हावा, असे ट्विट मलिंगान केली आहे. 

आशा आहे की तुम्ही लवकरात लवकर बरे व्हाल आणि पुन्हा तुमच्या पायावर उभे असाल, असे ट्विट ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटर रिकी पॉन्टींग यांनी केले आहे. 

ऋषभ पंतच्या (Rishabh Pant) अपघाताची नुकतीच माहिती मिळाली. तुझ्या साठी अनेक प्रार्थना आणि शुभेच्छा पाठवत आहे. तू लवकर बरा व्हावा हीच सदिच्छा, असे ट्विट पाकिस्तानचा खेळाडू शोएब मलिकने केली आहे. 

अपघाताचा थरार...

25 वर्षीय भारतीय क्रिकेटर ऋषभ पंतचा ( #RishabhPant) आज (30 डिसेंबर) पहाटे 5.30 वाजता अपघात झाला. त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे. त्यांची कार रेलिंगला धडकली आणि त्यानंतर तिला आग लागली. आईला सरप्राईज देण्यासाठी तो एकटाच घरी जात होता. अशा परिस्थितीत लवकरच मैदानात परतणे त्याच्यासाठी सोपे जाणार नाही. कारण टीम इंडियाला 3 जानेवारीपासून श्रीलंकेविरुद्ध वनडे आणि टी-20 मालिका खेळायची आहे. मात्र, दुखापतीमुळे तो या मालिकेतून बाहेर आहे. तो एनसीएमध्ये जाणार होता, पण आता अपघातामुळे त्याला बराच काळ बाहेर राहावे लागू शकते.

दरम्यान ऋषभ पंतसाठी (Rishabh Pant) क्रिकेट वर्तुळात अनेक ट्विट्स येत आहेत. अनेक खेळाडूंनी त्याच्या लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना केली आहे. आता तो लवकर बरा होऊन मैदानात परतावा, अशी अपेक्षा भारतीय क्रिकेट फॅन्स करतायत.