Video: 'या' कारणाने दिल्लीच्या कर्णधाराने मागितली दिनेश कार्तिकची माफी

आयपीएल सामन्यात एक दुर्घटना टळली

Updated: Sep 29, 2021, 01:12 PM IST
Video: 'या' कारणाने दिल्लीच्या कर्णधाराने मागितली दिनेश कार्तिकची माफी title=

दुबई : मंगळवारी दिल्ली कॅपिटल्स (DC) आणि कोलकाता नाईट रायडर्स (KKR) यांच्यात झालेल्या आयपीएल सामन्यात एक दुर्घटना टळली. वास्तविक, या सामन्यादरम्यान, ऋषभ पंतची बॅट विकेटकीपर दिनेश कार्तिकच्या तोंडाच्या अगदी जवळून गेली. हे दृश्य पाहून प्रेक्षक फार उडाले. दिनेश कार्तिकही स्वतःला वाचवत जमिनीवर पडला.

दिनेश कार्तिक थोडक्यात बचावला

ऋषभ पंतने दिल्ली कॅपिटल्स (DC) डावाच्या 17व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर मोठा शॉट खेळण्याचा प्रयत्न केला. पण खराब बाउन्समुळे चेंडू त्याच्या पॅडवर आदळला आणि विकेटच्या दिशेने गेला. ऋषभ पंतने चेंडू विकेटवर येण्यापासून वाचवण्यासाठी जोरात बॅट मध्ये घातली. समजूतदारपणा दाखवून कार्तिकने पंतची बॅट स्वतःच्या चेहऱ्यावर लागण्यापासून वाचवली आणि मैदानावर पडल

व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय

गोलंदाजी करणारा वरुण चक्रवर्तीही हे पाहून घाबरला. पंत वरुण चक्रवर्तीचा पहिला चेंडू ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न करत होता. पण चेंडू त्याच्या बॅटच्या तळाला लागल्यानंतर स्टंपच्या दिशेने जाऊ लागला. तो पकडण्याचा प्रयत्न करत कार्तिक पुढे आला. त्याचवेळी पंतने चेंडू रोखण्यासाठी मागे न बघता बॅट फिरवली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

पंतने कार्तिकची मागितली माफी

यानंतर ऋषभ पंतनेही दिनेश कार्तिकची माफी मागितली. आयपीएल 2021च्या 41 व्या सामन्यात कोलकाता नाइट रायडर्सने दिल्ली कॅपिटल्सचा तीन विकेट्सने पराभव केला.