माजी वेगवान गोलंदाजाचं जसप्रीत बुमराहबद्दल मोठं विधन, व्यक्त केली चिंता

जेव्हापासून बुमराहने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाऊल ठेवले आहे तेव्हापासून त्याच्या अ‍ॅक्शनबाबत बरीच चर्चा आहे. 

Updated: May 26, 2021, 04:42 PM IST
माजी वेगवान गोलंदाजाचं जसप्रीत बुमराहबद्दल मोठं विधन, व्यक्त केली चिंता title=

मुंबई: जसप्रीत बुमराह वेगवान गोलंदाजांमधील सर्वोत्तम गोलंदाज म्हणून जगभरात प्रसिद्ध आहे. कमी कालावधीमध्ये त्याने आपल्या कामगिरीनं जगभरात नाव कमवलं आहे. बुमराह कधीच आपल्या कर्णधाराला निराश करत नाही अशीही चर्चा जगभरात आहे. 

जेव्हापासून बुमराहने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाऊल ठेवले आहे तेव्हापासून त्याच्या अ‍ॅक्शनबाबत बरीच चर्चा आहे. त्याची कृती चमत्कारिक आहे. त्यामुळे फलंदाज बऱ्याचवेळा गोंधळतात. न्यूझीलंडचा माजी अष्टपैलू रिचर्ड हेडलीने म्हटले आहे की भारतीय वेगवान गोलंदाज बुमराहला विचित्र गोलंदाजीच्या अॅक्शनमुळे दुखापत होण्याची शक्यता जास्त आहे. हे सांगताना हेडलीनेही बुमराहच्या तंत्राचं कौतुक देखील केलं आहे. 

'बुमराहच्या गोलंदाजीची अॅक्शन खूप वेगळी आहे. त्याचा रनअप देखील जास्त नाहीय.त्याची पद्धत जरी शानदार असली तरी अशा पद्धतीमध्ये दुखापत होण्याचा धोका देखील असतो. त्याने आपल्या अॅक्शन आणि गोलंदाजीनं आपल्या कामगिरीनं स्वत:ला संपूर्ण जगासमोर सिद्ध केलं आहे. तो आपली शक्ती आणि गती दोन्हीचा योग्य समतोल राखून गोलंदाजी करतो' असंही हेडलीने म्हटलं आहे.

बुमराह किती काळ मैदानापर्यंत टिकेल हे सांगणं आतातरी कठीण आहे. बुमराहला जर दुखापत झाली तर ती त्याच्यासाठी घातक ठरू शकते. त्याच्या गोलंदाजी करण्याच्या पद्धतीमुळे त्याला दुखापत होण्याचा धोका अधिक असल्याची चिंता देखील हेडलीने व्यक्त केली आहे. 

जसप्रीत बुमराह आता इंग्लंड दौऱ्याची तयारी करत आहे. 18 ते 22 जून दरम्यान होणाऱ्या वर्ल्ड टेस्ट अंतिम सामन्यासाठी आणि त्यानंतर इंग्लंड विरुद्ध सीरिजसाठी त्याची तयारी सुरू आहे.