...म्हणून मोटरस्पोर्ट सोडून ती झाली पॉर्नस्टार

मोटरस्पोर्ट मधून कारकिर्दीची सुरुवात करणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या रिनी ग्रेसीने तिच्या आयुष्याचा ट्रॅकच बदलला आहे.

Updated: Jun 11, 2020, 11:17 PM IST
...म्हणून मोटरस्पोर्ट सोडून ती झाली पॉर्नस्टार title=

मेलबर्न : मोटरस्पोर्ट मधून कारकिर्दीची सुरुवात करणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या रिनी ग्रेसीने तिच्या आयुष्याचा ट्रॅकच बदलला आहे. मोटरस्पोर्टमधला खराब फॉर्म आणि यातून कमी पैसे मिळत असल्यामुळे रिनी ग्रेसी पॉर्न इंडस्ट्रीकडे वळली आहे. २०१५ साली रिनी ग्रेसी V-8 सुपरकार डुनलॉप सीरिजमध्ये भाग घेणारी १४ वर्षातली पहिलीच पूर्णवेळ महिला स्पर्धक बनली होती. 

रिनी ग्रेसीने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरून आपण मोटरस्पोर्ट सोडून पॉर्न इंडस्ट्रीकडे का वळलो? याचं कारण सांगितलं आहे. 'पॉर्न इंडस्ट्रीमध्ये येऊन मला २ महिन्यांचा काळही झाला नाही, पण या कालावधीमध्ये मी बरेच पैसे कमावले. २ महिन्यांनंतर माझी कमाई ६ अंकांमध्ये असेल. यामध्ये मला यश मिळालं आहे,' असं रिनी ग्रेसी म्हणाली. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

I wanted to share with you guys a little more about my OnlyFans! Why I did it, how it’s gone for me and a few things I’ve learnt along the way.

A post shared by RENÈE GRACIE  (@renee_gracie) on

'मी हे काम करत असल्यामुळे कोणी मला वाईट समजत असेल, तुमच्या या बोलण्यामुळे मला दु:ख होईल किंवा मी यामुळे काळजी करेन, असं तुम्हाला वाटत असेल, तर तो तुमचा गैरसमज आहे. हे काम करताना जोपर्यंत मला संकोच वाटत नाही किंवा जोपर्यंत या कामात मला समाधान मिळतं, तोपर्यंत मी पॉर्न इंडस्ट्रीमध्ये राहणार,' अशी प्रतिक्रिया रिनी ग्रेसीने या व्हिडिओमधून दिली आहे.

लोकांकडून होत असलेल्या टीकेलाही रिनी ग्रेसीने प्रत्युत्तर दिलं आहे. 'माझ्या भविष्याचा विचार करताना, मी माझ्या इतिहासाला मध्ये कशाला आणू? फक्त पैशासाठी एखाद्या अनोळख्या व्यक्तीला स्पर्श करणं माझ्यासाठी गरजेचं नाही,' असं वक्तव्य रिनीने केलं. 

ऑस्ट्रेलियातलं वृत्तपत्र डेली टेलिग्राफने दिलेल्या वृत्तानुसार रिनी ग्रेसीला तिच्या नव्या कारकिर्दीतून आर्थिक स्थैर्य मिळालं आहे. रिनी ग्रेसीला तिचे फोटो आणि व्हिडिओ विकून २५ हजार डॉलर (१८.८ लाख रुपये) प्रत्येक आठवड्याला मिळाल्याचं या वृत्तात म्हणलं आहे. 

'एवढ्या पैशांचा मी स्वप्नातही विचार केला नव्हता. या सगळ्याचा मी आनंद घेत आहे. माझे फोटो मी विकते आणि लोकं मला टिप देतात. ३० वर्षांसाठी घेतलेलं घरासाठीचं कर्ज मी १२ महिन्यांमध्येच फेडून टाकणार आहे,' असं रिनी ग्रेसीने सांगितलं.