सर्वात मोठा रेकॉर्ड, या संघाने ४० ओव्हरमध्ये ठोकले ५०३ रन

क्रिकेटमध्ये अनेक विक्रम बनतात आणि तुटतात. असाच एक विक्रम मंगळवारी बनला. एका क्रिकेटरने 256 नाबाद धावा ठोकल्या.

Updated: Nov 15, 2017, 10:16 AM IST
सर्वात मोठा रेकॉर्ड, या संघाने ४० ओव्हरमध्ये ठोकले ५०३ रन title=

नवी दिल्ली : क्रिकेटमध्ये अनेक विक्रम बनतात आणि तुटतात. असाच एक विक्रम मंगळवारी बनला. एका क्रिकेटरने 256 नाबाद धावा ठोकल्या.

निखिल गौतमने नाबाद 256 धावांच्या जोरावर संघाने 503 धावांचा डोंगर उभा केला. एडीडीसी लीगमध्ये मंगळवारी 464 धावांनी सुपरस्टार क्लबवर अजमल खां क्लबने विजय मिळवला.

त्रिपाठी ओव्हल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स मैदानावर अजमल खान क्लबने 40 षटकात 503 धावा केल्या. निखिल गौतमने 30 चौकार आणि 12 षटकारांसह नाबाद 256 धावा केल्या. दिनेश मोरेने 70 चेंडूत 18 चौकार व 2 षटकारांसह नाबाद 145 धावा केल्या. हृतिक कानोजियाने 84 धावा केल्या.

निखिल गौतम आणि दिनेश मोरे यांनी दुसऱ्या विकेटसाठी 359 धावा केल्या. सुपरस्टार क्लब संघ 9.3 षटकात 39 धावांवरच ढासळला. राहुल गहलोतने 28 धावा देत 5 बळी घेतले तर लेविस कुमारने 11 धावा देत 5 बळी घेतले. सुपरस्टार क्लबसाठी अर्जुन जैनने सर्वाधिक 22 रन केले.