मुंबई : भारताचा कर्णधार विराट कोहली असो किंवा सलामीवीर रोहित शर्मा अनेक भारतीय खेळाडूंच्या हेल्मेटवर भारताचा तिरंगा असतो. पण तुम्ही नीट पाहिले तर विकेटकीपर एम एस धोनीच्या हेल्मेटवर कधीच तिरंगा नसतो.
विकेटकीपर एम एस धोनीच्या हेल्मेटवर कधीच भारताच्या झेंड्याचा लोगो नसतो. अनेकदा तुम्ही बीसीसीआयचा लोगो पाहिला असेल. यामागील कारण जाणून घ्याल तर तुम्हांलाही धोनीचा अभिमान वाटेल.
एम एस धोनी हा विकेटकीपर म्हणून जेव्हा क्रिकेटच्या मैदानावर येतो तेव्हा त्याला अनेकदा हेल्मेट जमिनीवर ठेवावे लागते. हेल्मेट जमिनीवर ठेवणं म्हणजे त्यावर झेंड्याचा लोगो असल्यास आपला राष्ट्रध्वजही अनेकदा जमिनीवर ठेवणं असा होतो.
नियमांनुसार, राष्ट्रीय ध्वज जमिनीवर पडू नये किंवा इतर वस्तूंसोबत खाली ठेवू नये असा होतो. यामुळे धोनीने हेल्मेटवर तिरंगा न लावण्याचा निर्णय घेतला आहे.
देशाप्रती आदर राखणार्या धोनीच्या या निर्णयाचा त्याच्या चाहत्यांकडूनही स्वागत केले जात आहे.