IPL 2023: विराटने वाजवली प्लेट तर फाफने केला डान्स, RCB च्या ड्रेसिंग रूममधील Video व्हायरल!

IPL 2023, RCB: शेअर करण्यात आलेल्या व्हिडिओमध्ये (Viral Video) आरसीबी आरसीबी… असं म्हणत संघातील सर्व खेळाडू बंगळुरूचं अॅन्थम साँग (RCB Anthem song) एक सुरात गात असल्याचं दिसतंय.

Updated: Apr 21, 2023, 05:40 PM IST
IPL 2023: विराटने वाजवली प्लेट तर फाफने केला डान्स, RCB च्या ड्रेसिंग रूममधील Video व्हायरल! title=
RCB Dressing Room Video

RCB Dressing Room Video: स्टार विराट कोहली (Virat Kohli) याच्या नेतृत्वात खेळल्या गेलेल्या 27 व्या सामन्यात बंगळुरूने पंजाबचा (PBKS v RCB) धुव्वा उडवला. आरसीबीचा हा सहावा सामना होता. 175 धावांचा पाठलाग करताना पंजाबचा संघ फक्त 150 धावा करू शकता. त्यामुळे बंगळुरूने आणखी एक विजय नोंदवत दोन अंक खिशात घातले आहेत. अशातच आता विजयानंतर आयसीबीने एक व्हिडिओ (Viral Video) सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये आरसीबीचे खेळाडू विजयाचा आनंद लुटताना दिसत आहेत.

शेअर करण्यात आलेल्या व्हिडिओमध्ये आरसीबी आरसीबी… असं म्हणत संघातील सर्व खेळाडू बंगळुरूचं अॅन्थम साँग (RCB Anthem song) एक सुरात गात असल्याचं दिसतंय. पंजाबवर मिळवलेल्या या विजयानंतर जल्लोष साजरा करताना कोणीही मागे राहिलेलं दिसत नाही. सपोर्टिंग स्टाफ आणि खेळाडूंनी ड्रेसिंग रुममध्ये (RCB Dressing Room Video) आनंदोत्सव साजरा केला.

सामना झाल्यानंतर सर्व खेळाडू ड्रेसिंग रूममध्ये (Dressing Room ) जमले. प्रशिक्षकांनी नेहमीप्रमाणे चांगली कामगिरी केलेल्या खेळाडूंचं कौतूक केलं आणि आगामी सामन्याची रणनिती स्पष्ट केली. त्यावेळी कोणी जेवण करत होतं, तर कोणी आराम करत होतं. त्यावेळी सर्व खेळाडूंनी एकसुरात टीमचं अँथम गायलं. त्यावेळी विराट कोहलीने चमचाने प्लेट वाजवली. तर दुसरीकडे नियमीत कर्णधार फाफ डुप्लेसिसने (Faf du Plessis) बसल्या बसल्या भांगडा करून दाखवला.

पाहा Video 

दरम्यान, पंजाबसोबत झालेल्या सामन्यात डुप्लेसिस जखमी असल्याने त्याने कॅप्टन्सी केली नाही, त्याच्या ऐवजी विराटने ही जबाबदारी स्विकारली आणि बंगळुरूला विजय नोंदवून दिला. विराटने या सामन्यात 59 धावांची धुंवाधार खेळी देखील केली होती. आरसीबीचा आगामी सामना हा तगड्या राजस्थान रॉयल्सशी (Royal Challengers Bangalore vs Rajasthan Royals) होणार आहे. येत्या 23 एप्रिल रोजी हा सामना खेळवला जाईल.