रवींद्र जडेजाला दुसरा धक्का, टेस्ट क्रमवारीमध्ये घसरण

श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या टेस्टमध्ये निलंबनाची कारवाई झाल्यानंतर रवींद्र जडेजाला आणखी एक धक्का बसला आहे.

Updated: Aug 22, 2017, 05:29 PM IST
रवींद्र जडेजाला दुसरा धक्का, टेस्ट क्रमवारीमध्ये घसरण title=

मुंबई : श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या टेस्टमध्ये निलंबनाची कारवाई झाल्यानंतर रवींद्र जडेजाला आणखी एक धक्का बसला आहे. टेस्ट क्रमवारीतल्या ऑल राऊंडरच्या पहिल्या क्रमांकावरून जडेजाची घसरण झाली आहे. जडेजाच्या जागी आता बांग्लादेशचा शाकिब अल हसन ऑल राऊंडरच्या यादीत पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे.

ऑल राऊंडरच्या पहिल्या क्रमांकावरून जडेजाची गच्छंती झाली असली तरी टेस्ट बॉलरच्या यादीमध्ये जडेजानं पहिला क्रमांक कायम ठेवला आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर इंग्लंडचा जेम्स अंडरसन आणि तिसऱ्या क्रमांकावर आर. अश्विन आहे. ऑल राऊंडर खेळाडूंच्या यादीमध्ये अश्विन तिसऱ्या क्रमांकावर आहे.

बॅट्समनच्या क्रमवारीमध्ये ऑस्ट्रेलियाचा स्टिव्ह स्मिथ पहिल्या क्रमांकावर कायम आहे तर चेतेश्वर पुजारा चौथ्या, विराट कोहली पाचव्या, लोकेश राहुल नवव्या आणि अजिंक्य रहाणे दहाव्या क्रमांकावर आहे. देशांच्या रॅकिंगमध्ये भारत पहिल्या क्रमांकावर कायम आहे.