Ravindra Jadeja: रवींद्र जडेजा पत्नी रिवाबासह फिरतोय कुठं? आशापुरा मातेचं घेतलं दर्शन अन्... फोटो व्हायरल!

Ravindra Jadeja, India vs West Indies: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलनंतर रवींद्र जडेजा आगामी वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटी सामना खेळणार आहे. त्याआधी रवींद्र जडेजा पत्नी रिवाबासोबत (Raviba Jadeja) कच्छमधील आशापुरा मातेच्या दर्शनासाठी पोहोचला.

Updated: Jun 28, 2023, 07:17 PM IST
Ravindra Jadeja: रवींद्र जडेजा पत्नी रिवाबासह फिरतोय कुठं? आशापुरा मातेचं घेतलं दर्शन अन्... फोटो व्हायरल! title=
Ravindra Jadeja Ashapura Mata Temple With Wife Rivaba Jadeja

Ashapura Mata Temple: टीम इंडिया जुलै महिन्यात वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात टीम इंडिया कसोटी, वनडे आणि टी-20 मालिका खेळणार असल्याने आता टीम इंडियाचे खेळाडू सध्या आराम करत असल्याचं दिसतंय. कसोटी आणि वनडे मालिकेसाठी बीसीसीआयने टीम इंडियाचा संघ जाहीर केला आहे. यामध्ये टीम इंडियाचा स्टार रविंद्र जडेजा याला संधी देण्यात आलीये. अशातच आता जडेजा परिवारासह सुट्टी एन्जॉय करताना दिसतोय.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलनंतर रवींद्र जडेजा आगामी वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटी सामना खेळणार आहे. त्याआधी तो पत्नीसह  देवदर्शन करत असल्याचं दिसतंय. रवींद्र जडेजा पत्नी रिवाबासोबत कच्छमधील आशापुरा मातेच्या दर्शनासाठी पोहोचला. त्याचा फोटो जडेजाने त्याच्या अकाऊंटवरून शेअर केला होता. त्याचा फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहे.

आणखी वाचा - MS Dhoni: धोनी खेळाडूंवर करायचा इमोशनल अत्याचार? सुरेश रैनाने केली पोलखोल, म्हणाला...

रवींद्र जडेजाची पत्नी रिवाबाने देखील काही फोटो ट्विट केले आहेत. त्यात रिवाबा पारंपारिक साडीमध्ये दिसत आहे. तर जड्डू आशापुरा मातेचे दर्शन घेताना दिसतोय. तीन हजारहून अधिक लोकांनी या फोटोला लाईक केलं असून अनेकांनी यावर कमेंट्चा पाऊस देखील पाडलाय.

वेस्टइंडीज दौऱ्याचं वेळापत्रक

पहिली कसोटी सामना - 12 ते 16 जुलै, डोमिनिका
दुसरा कसोटी सामना - 20 ते 24 जुलै, पोर्ट ऑफ स्पेन

पहिला एक दिवसीय सामना - 27 जुलै, ब्रिजटाउन
दुसरा एक दिवसीय सामना- 29 जुलै, ब्रिजटाउन
तिसरा एक दिवसीय सामना- 1 ऑगस्ट, पोर्ट ऑफ स्पेन

पहिला टी20 सामना - 3 ऑगस्ट, पोर्ट ऑफ स्पेन
दुसरा टी20 सामना - 6 ऑगस्ट, गुयाना
तिसरा टी20 सामना - 8 ऑगस्ट, गुयाना
चौथा टी20 सामना - 12 ऑगस्ट, फ्लोरिडा
पाचवा टी20 सामना - 13 ऑगस्ट, फ्लोरिडा

वेस्ट इंडिज मालिकेसाठी भारताचा एकदिवसीय संघ

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, ऋतुराज गायकवाड, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन (विकेटकीपर), इशान किशन (विकेटकीपर, हार्दिक पंड्या (उपकर्णधार), शार्दुल ठाकूर, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, जयदेव उनाडकट, मोहम्मद सिराज, उमरान मलिक आणि मुकेश कुमार.