IND vs AUS, Border Gavaskar Trophy 2023: मानाच्या मानल्या जाणाऱ्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफी (Border-Gavaskar Trophy) मालिकेला येत्या 9 फेब्रुवारीपासून सुरूवात होणार आहे. ही सिरीज (India vs Australia) जिंकून पहिल्या स्थानावर विराजमान होण्यासाठी टीम इंडिया सज्ज झाली आहे. शांततेच्या काळात दोन्ही संघ रणनिती ठरवत असल्याचं पहायला मिळतंय. कॅप्टन रोहित शर्मा (Rohit Sharma) देखील वेगवेगळ्या पर्यायांवर विचार करतोय. अशातच आता टीम इंडियाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri) यांनी टीम इंडियाला कानमंत्र दिलाय. (Ravi Shastri said before border gavaskar trophy that ravi ashwin form might decide the ind vs aus test series result latest sports news)
अश्विन चांगलाच फॉरमध्ये आहे, यामुळे मालिकेचा निकाल लागू शकतो. तो बर्याच परिस्थितीत जागतिक दर्जाचा गोलंदाज आहे, परंतु भारतीय परिस्थितीत तो ऑस्ट्रेलियासाठी घातक ठरतोय. जर बॉल फिरू लागला अन् पीचची मदत मिळाली, तर तो बहुतेक फलंदाजांसाठी समस्या निर्माण करेल, असा विश्वास रवी शास्त्री यांनी (Ravi Shastri on Ravi Ashwin) व्यक्त केला आहे.
अश्विनला (Ravi Ashwin) जास्त नियोजन करण्याची गरज नाही. त्यानं आपल्या मूळ योजनेवर ठाम राहावं, कारण तो एक महत्त्वाचा खेळाडू आहे. त्याचा फॉर्म मालिकेचा निकाल लावू शकतो. अश्विन बॉलिंगचं एक पॅकेज म्हणून येतो. तो तुम्हाला फलंदाजीत आवश्यक धावाही देऊ शकतो, त्याचा त्याचा फायदा नक्कीच भारतीय संघाला होईल, असं रवी शास्त्री (Ravi Shastri) म्हणतात.
दरम्यान, रवी शास्त्री यांनी यावेळी सूर्यकुमार यादववर (Suryakumar Yadav) देखील मोठं वक्तव्य केलंय. सूर्यकुमारला संधी मिळाल्यास तो त्याचा नॅचरल खेळ करेल याची खात्री आहे. त्याच्यामध्ये सातत्याने एक-दोन धावा काढत राहण्याची क्षमता आहे. सूर्यकुमार फटकेबाजी करून ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांना अडचणीत टाकू शकतो, असा विश्वास रवी शास्त्री यांनी व्यक्त केलाय. ऋषभ पंतच्या (Rishabh Pant) आक्रमक फटकेबाजीचा पुरेसा पर्याय सूर्यकुमार ठरू शकतो का?, असा सवाल देखील उपस्थित होताना दिसतोय.
रोहित शर्मा (C) शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, केएल राहुल, एस भरत, इशान किशन, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यज्ञ, उमेश यार. जयदेव उनाडकट
उस्मान ख्वाजा, मॅट रेनशॉ, स्टीव्ह स्मिथ, डेव्हिड वॉर्नर, ट्रॅव्हिस हेड, मार्नस लॅबुशेन, अॅश्टन अगर, कॅमेरॉन ग्रीन, अॅलेक्स कॅरी, पीटर हँड्सकॉम्ब, पॅट कमिन्स (C), स्कॉट बोलँड, जोश हेझलवूड, नॅथन लायन, लान्स मॉरिस, टॉड मर्फी मिचेल स्टार्क, मिचेल स्वीपसन