Ravi Shastri : टीम मॅनेजमेंट राहुलचा परफॉर्मन्स...; उपकर्णधारपदाच्या मुद्द्यावरून रवी शास्त्रीचं मोठं वक्तव्य

टेस्ट सामन्यांसाठी टीम इंडियाच्या उपकर्णधाराची (Team India vice-captain) नियुक्ती करण्यात आलेली नाही. दरम्यान यावर आता टीम इंडियाचे माजी कोच रवी शास्त्री (Ravi Shastri) यांनी वक्तव्य केलं आहे. 

Updated: Feb 26, 2023, 04:35 PM IST
Ravi Shastri : टीम मॅनेजमेंट राहुलचा परफॉर्मन्स...; उपकर्णधारपदाच्या मुद्द्यावरून रवी शास्त्रीचं मोठं वक्तव्य title=

Ravi Shastri : भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यामध्ये सध्या 4 सामन्यांची टेस्ट सिरीज सुरु आहे. बॉर्डर गावस्कर (Border–Gavaskar Trophy) सिरीजचे 2 सामने झाले असून तिसरा सामना इंदूरमध्ये 1 तारखेपासून खेळवला जाणार आहे. दरम्यान या सिरीजमध्ये टीम इंडियाने (Team India) 2-0 अशी आघाडी घेतली असून नुकतंच उर्वरित दोन टेस्ट सामन्यांसाठी भारतीय टीमची घोषणा करण्यात आलीये. मात्र यावेळी टेस्ट सामन्यांसाठी टीम इंडियाच्या उपकर्णधाराची (Team India vice-captain) नियुक्ती करण्यात आलेली नाही. दरम्यान यावर आता टीम इंडियाचे माजी कोच रवी शास्त्री (Ravi Shastri) यांनी वक्तव्य केलं आहे. 

के.एल राहुलकडून काढलं उपकर्णधारपद

टीम इंडियाची ज्यावेळी घोषणा करण्यात आली त्यावेळी उपकर्णधार म्हणून कोणत्याही खेळाडूचं नाव देण्यात आलं नाही. यापूर्वी टेस्ट टीममध्ये के. एल राहुल उपकर्णधाराची जबाबदारी सांभाळत होता. मात्र गेल्या काही काळापासून के.एल राहुलचा अत्यंत वाईट फॉर्ममध्ये आहे. त्यामुळे त्याच्याकडून हे उपकर्णधारपद काढून घेतलं असल्याची चर्चा आहे.

दरम्यान आता प्रश्न असा आहे की, टीम इंडियाच्या उपकर्णधार कोणाला देणार? दरम्यान टीम इंडियाचे माजी कोच रवी शास्त्री यांनी याबाबत मोठं विधान केलं आहे. रवी शास्त्री यांनी याबाबत सांगितलं की, घरच्या टेस्ट सिरीजमध्ये उपकर्णधारपद असू नये, कारण टीमचा उपकर्णधार फॉर्ममध्ये नसेल तर त्याचा वाईट परिणाम होताना दिसतो.

काय म्हणाले रवी शास्त्री? 

रवी शास्त्री बोलले की, शेवटच्या दोन टेस्ट सामन्यांसाठी शुभमन गिलला संधी दिली गेली पाहिजे. मुख्य म्हणजे टीम मॅनेजमेंट राहुलचा परफॉर्मन्स पाहतोय. यासोबतच ते बाहर असलेल्या शुभमन गिलला देखील पाहतायत. मला नाही वाटत टीम इंडियाला उपकर्णधार नियुक्त केलं पाहिजे. जर एखादी वेळ अशी आली की, कर्णधाराला फिल्ड सोडावं लागलं, तर तुमचा कोणतातरी एक खेळाडू ही जबाबदारी सांभाळू शकतो. 

बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी टेस्ट सिरीज

•    पहिला टेस्ट- भारताचा डाव आणि 132 रन्सने विजय
•    दूसरी टेस्ट- भारताचा 6 विकेट्सने विजय
•    तिसरी टेस्ट- 1 ते 5 मार्च, इंदूर
•    चौथी टेस्ट- 9 ते 13 मार्च, अहमदाबाद