मुंबई : बुधवारी रात्री मुंबई आणि हैदराबाद यांच्यात आणखी एक रोमांचक सामना पाहायला मिळाला. या सामन्यात हैदराबादने शेवटच्या चेंडूवर १ विकेट राखून दिमाखदार विजय मिळवला. त्यांचा या स्पर्धेतील सलग दुसरा विजय तर मुंबईचा सलग दुसरा पराभव.
या सामन्यात हैदराबादच्या संघातील प्रत्येक खेळाडूने महत्त्वाची भूमिका बजावली. गोलंदाजी बिली स्टेनलेक, संदीप शर्म आणि सिद्धार्थ कौलने यांनी सर्वाधिक २-२ विकेट घेतले. तर फलंदाजीत शिखर धवन(४५) आणि दीपक हुडा (३२) यांनी विजय मिळवून दिला. दरम्यान यापैकी एकालाही मॅन ऑफ दी मॅच पुरस्कार देण्यात आला नाही.
सामन्यानंतर झालेल्या सोहळ्यात रशीद खानला मॅन ऑफ दी मॅचचा पुरस्कार देण्यात आला. रशीद खानने या सामन्यात बेन कटिंगच्या रुपात केवळ एक विकेट घेतला मात्र त्याने चार ओव्हरमध्ये १८ बॉल निर्धाव टाकले. त्यामुळे एकूण ओव्हरपैकी तीन ओव्हरमध्ये त्याने एकही धाव दिली नाही.. रशीदने ४ ओव्हरमध्ये १३ धावा दिल्या आणि एक विकेट मिळवला. यामुळे मुंबईला केवळ १४७ धावा करता आल्या.
१९ वर्षीय अफगाणी स्पिनर रशीद खानने गेल्या वर्षीच्या सीझनमध्ये चांगली गोलंदाजी केली होती. त्याने हैदराबादकडून खेळताना १४ सामन्यांत १७ विकेट घेतले होते. दरम्यान त्याने नुकताच वनडेत नवा इतिहास रचलाय. तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक १०० विकेट घेणारा खेळाडू ठरलाय.
वर्ल्डकप क्वालिफायर्समध्ये वेस्ट इंडिजविरुद्धच्या अंतिम सामन्यात रशीदने ४३ सामन्यांतील ४१ डावांमध्ये १४.१२च्या सरासरीने ९९ विकेट घेतले होते. इंडिजविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात रशीदने शाय होपला एलबीडब्ल्यू केले आणि १०० विकेट पूर्ण केल्या. याआधी हा रेकॉर्ड ऑस्ट्रेलियाच्या मिचेल स्टार्कच्या नावे होता.