अरे कोण म्हणतं Ajinkya Rahane संपला... पठ्ठ्यानं वादळी शतक केलंय; टीम इंडियात पुन्हा ठोकला दावा!

मुंबईच्या (Mumbai Team) टीमचं कर्धणारपद सांभाळून त्याने शतक झळकावत आपलं नाणं पुन्हा एकदा खणखणीत वाजवलं आहे. रहाणे 121 बॉल्समध्ये 18 फोर आणि 2 सिक्सेसच्या मदतीने त्याने आपलं शतक पूर्ण केलं आहे.

Updated: Dec 20, 2022, 08:48 PM IST
अरे कोण म्हणतं Ajinkya Rahane संपला... पठ्ठ्यानं वादळी शतक केलंय; टीम इंडियात पुन्हा ठोकला दावा! title=

Ranji Trophy Ajinkya Rahane Century: टीम इंडियामधून (Team India) बाहेर असलेला अनुभवी खेळाडू अजिंक्य रहाणेने (Ajinkya Rahane) रणजी ट्रॉफीमध्ये (Ranji Trophy) धमाल उडवलीये. हैदराबादविरूद्ध झालेल्या सामन्यामध्ये (Mumbai vs Hyderabad) अजिंक्य रहाणेने दणदणीत शतक ठोकलंय. मुंबईच्या (Mumbai Team) टीमचं कर्धणारपद सांभाळून त्याने शतक झळकावत आपलं नाणं पुन्हा एकदा खणखणीत वाजवलं आहे. रहाणे 121 बॉल्समध्ये 18 फोर आणि 2 सिक्सेसच्या मदतीने त्याने आपलं शतक पूर्ण केलं आहे. सध्या तो 139 रन्सवर नाबाद असून मुंबईची टीम मजबूत स्थितीत आहे

11 महिने रहाणे टीम इंडियाच्या बाहेर

टीमचा हा स्टार खेळाडू टीम इंडियाचा हा स्टार खेळाडू टीम इंडियाच्या बाहेर आहे. 2022 जानेवरीमध्ये दक्षिण आफ्रिकेविरूद्ध वाईट पद्धतीने फ्लॉप झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला टीममधून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला होता. तेव्हापासून ते आतापर्यंत 11 महिने उलटले, तरीही रहाणेची टीममध्ये एन्ट्री झाली नाही.

प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये रहाणेचं 38 वं शतक

प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये अजिंक्य रहाणेची बॅट चांगलीच चालली आहे. सध्या तो मुंबईचा कर्णधारपदाची धुरा देखील तो सांभाळतोय. हैदराबादविरूद्ध खेळताना त्याने प्रथम श्रेणीमधील 38 वं शतक ठोकलं आहे.

मुंबईच्या टीमने केले 457 रन्स

सध्याच्या स्थितीत मुंबईच्या टीमने 3 विकेट्स गमावत 457 रन्स केले आहे. यामध्ये पृथ्वी शॉ, यशस्वी जयस्वाल 162, सूर्यकुमार यादव 90 तर अजिंक्य 139 रन्सवर नाबाद खेळतोय. रहाणे सोबत सरफराज खान देखील 31 रन्सवर नाबाद आहे.

जानेवारी 2021 मध्ये खेळला होता शेवटचा इंटरनॅशनल सामना

रहाणेने त्याच्या शेवटचा इंटरनॅशनल सामना जानेवारी 2021 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरूद्ध खेळला होता. या सामन्यात त्याने दोन्ही डावांमध्ये 10 रन्स केले होते. यामध्ये पहिल्या डावात 1 तर दुसऱ्या डावामध्ये 9 रन्स करून तो पव्हेलियनमध्ये परतला होता. 

ऑस्ट्रेलिया विरूद्ध होणाऱ्या सिरीजमध्ये रहाणेला मिळणार एन्ट्री?

टीम इंडियाचा माजी कर्णधार अजिंक्य रहाणेने बीसीसीआयला पुन्हा एकदा त्याची पात्रता दाखवून दिली आहे. 2023 मध्ये ऑस्ट्रेलियाविरूद्ध होणाऱ्या सिरीजमध्ये आता अजिंक्य रहाणेला संधी मिळणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे.