'...अन्यथा Lockdown करावाच लागेल', आरोग्यमंत्र्यांचा गंभीर इशारा

मुख्यमंत्र्यांनी राज्यात लॉकडाऊनचे संकेत दिले आहेत. लॉकडाऊनबाबत नियोजन करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला दिले आहेत. 

Updated: Mar 28, 2021, 06:46 PM IST
'...अन्यथा Lockdown करावाच लागेल', आरोग्यमंत्र्यांचा गंभीर इशारा title=

मुंबई: देशात कोरोनाच्या रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढ होत असल्याचं पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रात वेगानं रुग्णांची संख्या वाढत असल्यानं ही चिंतेची बाब आहे. नागरिक नियमांना कचऱ्याची टोपली दाखवत असल्याचं वेळोवेळी पाहायला मिळत असल्यानं आता प्रशासन आणि आरोग्यमंत्र्यांनी गंभीर इशारा दिला आहे. 

गेल्या महिनाभरात राज्यात कोरोना बाधितांची आकडेवारी थक्क करणारी आहे. अनेक जिल्ह्यात निर्बंध करूनही नागरिक ऐकत नाही. दर दिवशी कोरोनाच्या रुग्णसंख्येत 10 टक्के वाढ होत आहे. ही बाबा अत्यंत चिंताजनक असल्याचं आरोग्यमंत्री म्हणाले आहेत. 

नियम पाळत नसल्यानं आपण लॉकडाऊनकडे वाटचाल करत असल्याचं राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्र्यांसोबत व्हिडीओ कॉन्फरन्स बैठक झाली असून कोरोनाची रुग्णसंख्या कमी करण्यासाठी काय उपाययोजना करायच्या याबाबत चर्चा झाली असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितलं.

कुठल्याही परिस्थितीत लोकांना निर्बंध पाळावेच लागतील अन्यथा लॉकडाऊन लावावाच लागेल असंही आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं. राज्यात कोरोना लसीकरणाचा वेग असता आणखी वाढवणार असून लसीकरणाच्या प्रमाणात केंद्राने लसींचा पुरवठा करावा अशी मागणीही त्यांनी केली आहे. 

यापुढे कोरोनाचे थोडेही लक्षणं आढळल्यास नागरीकांनी कोरोना चाचणी करून घ्यावी असं आवाहन करत यानंतर कोरोना बाधित रुग्णाला होम आयसोलेशनमध्ये ठेवलं जाणार नाही. कोविड रुग्णालयातच उपचार घ्यावे लागतील असंही सांगितलं. जिल्ह्या-जिल्ह्यात कोरोनाची काय परिस्थिती आहे.हे त्या जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांना लेखी पाठवायचं असून त्यांच्या परवानगीनंतरच लॉकडाऊन लावायचा असा निर्णय आजच्या बैठकीत झाल्याचं देखील टोपे म्हणाले.

मुख्यमंत्र्यांनी राज्यात लॉकडाऊनचे संकेत दिले आहेत. लॉकडाऊनबाबत नियोजन करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला दिले आहेत. लोक निर्बंध पाळत नसल्यानं राज्यात लॉकडाऊनची तयारी सुरू करावी लागेल, असे संकेत मिळत आहेत. त्यातच टास्क फोर्सनं मृत्यू वाढण्याची भीती व्यक्त केल्यानं चिंता वाढली आहे. निर्बंध पाळले नाहीत, तर लॉकडाऊन करावा लागेल, असा इशारा आरोग्यमंत्री राजेश टोपेंनीही दिला आहे.