Rajeev Shukla On MS Dhoni's jersey : कॅप्टन कुल महेंद्रसिंह धोनी याने त्याच्या क्रिकेटिंग करियरमध्ये टीम इंडियाला एका नव्या उंचीवर पोहोचवलं. मै पल दो पल का शायर हूँ म्हणत धोनीने (MS Dhoni) तीन वर्षापूर्वी निवृत्ती घेतली होती. अशातच आता बीसीसीआयने धोनीच्या सन्मानार्थ मोठी घोषणा केली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने म्हणजेच बीसीसीआयने (BCCI) क्रिकेटपटू एमएस धोनीची नंबर 7 ची जर्सी निवृत्त करण्याचा (Ms Dhonis No 7 Jersey Retired) निर्णय घेतला. त्यावर आता बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला (Rajeev Shukla) यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.
काय म्हणाले राजीव शुक्ला?
बीसीसीआयचा हा निर्णय एमएस धोनीचे राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील योगदान लक्षात घेऊन आहे आणि त्याच्यासाठी हा सन्मान आहे. जर्सी क्रमांक 7 ही महेंद्रसिंग धोनीची ओळख होती आणि तो ब्रँड कमी होऊ नये म्हणून बीसीसीआयने उचललेले हे पाऊल कौतुकास्पद आहे, अशी माहिती राजीव शुक्ला यांनी दिली आहे.
बीसीसीआयने आत्तापर्यंत दोन खेळाडूंना विशेष सन्मान दिला आहे. याआधी बीसीसीआयने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरची 10 नंबरची जर्सी निवृत्त केली होती. त्यानंतर आता धोनीची 7 नंबर जर्सी खेळाडूंना निवडता येणार नाही. त्यामुळे आता आगामी काळात टीम इंडियामध्ये सामील होणाऱ्या खेळाडूंना 7 आणि 10 नंबरची जर्सी निवडता येणार नसल्याने खेळाडूंना दुसरा नंबर घ्यावा लागणार आहे.
#WATCH | Delhi: On cricketer MS Dhoni's jersey being retired by the Board of Control for Cricket in India (BCCI), Rajeev Shukla (Vice-President BCCI) says, “This decision by the BCCI is keeping in mind the contribution of MS Dhoni in national as well as international cricket and… pic.twitter.com/ES84trfdlh
— ANI (@ANI) December 15, 2023
दरम्यान, महेंद्रसिंग धोनीने (Mahendra Singh Dhoni) आपला शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना न्यूझीलंडविरुद्ध 2019 एकदिवसीय विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत खेळला होता. या सामन्यात झालेल्या रनआऊटनंतर धोनीने आतंरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला. धोनी सध्या आयपीएल देखील खेळता. त्याची यंदाची आयपीएल अखेरची असण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता धोनीच्या चाहत्यांना त्याला अखेर खेळताना पाहता येणार आहे.