महिला क्रिकेटर्सना रेल्वे देणार प्रमोशन

महिला क्रिकेट वर्ल्डकपमधील अंतिम सामन्यात भारतीय संघाचा जरी पराभव झाला असला तरी त्यांच्या कामगिरीने प्रत्येक भारतीयाचे मन जिंकलेय. 

Updated: Jul 24, 2017, 05:22 PM IST
महिला क्रिकेटर्सना रेल्वे देणार प्रमोशन title=

नवी दिल्ली : महिला क्रिकेट वर्ल्डकपमधील अंतिम सामन्यात भारतीय संघाचा जरी पराभव झाला असला तरी त्यांच्या कामगिरीने प्रत्येक भारतीयाचे मन जिंकलेय. 

भारतीय संघाने संपूर्ण वर्ल्डकपमध्ये जबरदस्त कामगिरी करताना अंतिम फेरी गाठली. मात्र अंतिम फेरीत त्यांना पराभवास सामोरे जावे लागले. वर्ल्डकपमध्ये शानदार प्रदर्शन करणाऱ्या महिला क्रिकेटर्सना रेल्वेकडून प्रमोशनचे गिफ्ट मिळणार आहे. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी ही घोषणा केलीये.

भारताच्या १५ सदस्यीय महिला संघापैकी १० क्रिकेटर्स रेल्वेशी संबंधित आहेत. यात कर्णधार मिताली राज आणि उपकर्णधार हरमनप्रीत कौर यांचाही समावेश आहे. मिताली, हरमनप्रीतशिवाय एकता बिश्त, पूनम राऊत, वेदा कृष्णमूर्ती, पूनम यादव, सुषमा वर्मा, मोना मेश्राम, राजेश्वरी गायकवाड आणि नुजहत परवीन या रेल्वेशी संबंधित आहेत प्रमोशनशिवाय त्यांना रोख बक्षीसेही दिली जाणार आहेत. 

आरएसपीबीचे सचिव रेखा यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार, रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी भारतीय संघाला शुभेच्छा दिल्यात. तसेच ज्या रेल्वेत नोकरी करतात त्यांना प्रमोशनही दिले जाणार असल्याचीही घोषणा केलीये. तसेच त्यांना रोख बक्षीसही दिले जाणार आहे.