Rahul Dravid Aggressive Side World Cup: भारतामध्ये क्रिकेट खेळणाऱ्या प्रत्येक खेळाडूचं स्वप्न असतं की त्याला भारतीय संघात स्थान मिळावं आणि खेळाडू म्हणून आपल्या जडणघडणीमध्ये कुठेतरी माजी कर्णधार तसेच प्रशिक्षक राहुल द्रविडचा हातभार लागावा. खरं तर राहुल द्रविड हा अत्यंत शांत स्वभावाचा, फारसा उतावळेपणा न करणारा आणि संयम क्रिकेटपटू तसेच व्यक्ती म्हणून ओळखला जातो.
मुलांच्या पालकसभेला सेलिब्रिटी स्टेटस बाजूला सोडून रांगेत उभं राहणं असो किंवा तासन् तास मैदानावर तंबू ठोकून केलेली फलंदाजी असो द्रविडने जे काही केलं ते त्याच्या साधेपणामुळे लक्षात राहिलं असं म्हटल्यास वावगणं ठरणार नाही. त्यामुळेच द्रविडचं मार्गदर्शन सर्वांना हवंहवंसं वाटतं. सध्या भारतीय संघात नव्यानेच आलेल्या खेळाडूंना मात्र द्रविडचा प्रशिक्षक म्हणून फारसा सहवाल लाभला नाही. यामध्ये भारतीय सलामीवीर अभिषेक शर्माचाही समावेश आहे. मात्र मुख्य संघात अभिषेक द्रविडबरोबर फारसा नव्हता तरी 2018 च्या 19 वर्षाखालील वर्ल्ड कपवर भारताने नाव कोरलं त्यावेळेस द्रविडच्या प्रशिक्षणाअंतर्गत खेळलेल्या संघात अभिषक शर्मा होता.
2018 चा वर्षाखालील वर्ल्ड कप भारताने अपराजित राहत जिंकला होता. भारताने पाकिस्तान, बांगलादेश आणि ऑस्ट्रेलियासारख्या संघांना या स्पर्धेत एखदा नाही दोनदा नमवलं होतं. मात्र सामान्यपणे पाकिस्तानविरुद्धचा सामना हाय व्होल्टेज होईल असं मानलं जात असतानाच प्रत्यक्षात बांगलादेशविरुद्धचा सामना फारच गाजला होता. विशेष म्हणजे यापैकी पहिल्या सामन्यात राहुल द्रविडचं यापूर्वी कधीही पहिलं नसलेलं रुप तरुण खेळाडूंना पाहायला मिळाल्याचा किस्सा अभिषेक शर्माने नुकताच सांगितला.
नक्की वाचा >> हार्दिकची अनेक लफडी? नताशाने रंगेहाथ पकडल्यानंतर...; धक्कादायक दाव्याने एकच खळबळ
"आम्ही बांगलादेशविरुद्ध 19 वर्षांखालील आशिया चषक स्पर्धेमध्ये पराभूत झाला होतो. वर्ल्ड कपमध्ये आम्ही पुन्हा त्यांच्याविरुद्ध खेळण्यासाठी मैदानात उतरलो त्यावेळेस राहुल द्रविडने आम्हाला सांगितलं की जर त्यांनी तुम्हाला शिव्या दिल्या तर तुम्हीही त्यांना शिव्या द्या. खरं तर कोणालाही राहुल द्रविड असं काही बोलेल असं अपेक्षित नव्हतं. त्या सामन्यामध्ये हे ऐकल्यानंतर आम्ही अतिशय निर्भिडपणे मैदानावर उतरलो," असं अभिषेकने त्याचा माजी सरकारी असलेल्या मनतोज कालराच्या पॉडकास्टवर बोलताना सांगितलं.
नक्की वाचा >> मुंबईच्या चाहत्यांसाठी धक्कादायक बातमी! रोहित, सूर्यकुमार सोडणार संघ? IPL 2025 'या' टीमकडून खेळणार?
द्रविडनेच समोरच्या संघातील खेळाडूंना शिव्या द्यायला सांगणं हे चाहता म्हणून ही अनेक क्रिकेटप्रेमींना पटणं कठीण असलं तरी प्रत्यक्ष त्या संघातून खेळलेल्या खेळाडूनेच हा खुलासा केल्याने सध्या या पॉडकास्टची तुफान चर्चा आहे. मात्र राहुल द्रविडने ड्रेसिंग रुममध्ये सामन्याआधी संघाला प्रेरणा देण्यासाठी मैदानात जशास तसं वागा असं सांगितल्याचंही अभिषेक आवर्जून म्हणाला.