B'DAY SPECIAL: टीम इंडियाचा सर्वात 'SEXY' क्रिकेटर

भारतीय क्रिकेटमधील महान फलंदाजांपैकी एक म्हणून राहुल द्रविडचे नाव घेतले जाते. राहुलचा जन्म ११ जानेवारी १९७३मध्ये झाला. कर्नाटककडून खेळणाऱ्या या  क्रिकेटरने आपल्या विशेष शैलीने जगभरात आपले नाव केले. 

archana harmalkar अर्चना हरमलकर | Updated: Jan 11, 2018, 10:05 AM IST
B'DAY SPECIAL: टीम इंडियाचा सर्वात 'SEXY' क्रिकेटर title=

मुंबई : भारतीय क्रिकेटमधील महान फलंदाजांपैकी एक म्हणून राहुल द्रविडचे नाव घेतले जाते. राहुलचा जन्म ११ जानेवारी १९७३मध्ये झाला. कर्नाटककडून खेळणाऱ्या या  क्रिकेटरने आपल्या विशेष शैलीने जगभरात आपले नाव केले. 

द वॉल या नावाने राहुलला ओळखले जाते. त्याने अनेक कसोटी सामन्यांमध्ये भारताला विजय मिळवून दिलाय. १२ व्या वर्षामध्ये त्याने क्रिकेटक खेळण्यास सुरुवात केली. त्याचा आज ४५वा वाढदिवस आहे. त्याच्या आयुष्य़ाशी निगडित या गोष्टी जाणून घ्या...

१. राहुल द्रविडने कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक चेंडूंचा सामना केलाय. कसोटीतील २८६ डावांमध्ये ३१ हजार २५८ चेंडूंचा सामना केला. तर १३ हजार २८८ धावा केल्या. कसोटीत सर्वाधिक कॅच घेण्याचा रेकॉर्डही २१० राहुलच्या नावावर आहे. 

२. परदेशी खेळपट्ट्यांवर राहुल सर्वाधिक यशस्वी फलंदाज ठरलाय. २० जून १९९६मध्ये इंग्लंडच्या लॉर्ड्समध्ये कसोटी पदार्पण करणाऱ्या राहुलने ९५ धावा केल्या होत्या.

३. आधुनिक क्रिकेटमध्ये राहुल असा एकमेव फलंदाज आहे ज्यांने चार कसोटीमध्ये चार शतक झळकावले. इंग्लंड दौऱ्यात त्याने ११५, १४८ आणि २०१ धावा केल्य. त्यानंतर वेस्ट इंडिजविरुद्ध मुंबईत राहुलने शतक झळकावले.

४. सर्वात मोठ्या पार्टनरशिपचा रेकॉर्डही भारताच्या द्रविडच्या नावावर आहे. जानेवारी २००६मध्ये राहुलने सेहवागसह पाकिस्तानविरुद्ध ४१० धावांची भागीदारी साकारली होती. याशिवाय राहुलने व्ही व्ही एस लक्ष्मणसह कोलकातामध्ये २००१मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध ३७६ धावांची भागीदारी केली होती.

५. राहुल द्रविड कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात यशस्वी कर्णधार ठरला. त्याच्या नेतृत्वाखाली भारताने सलग १४ कसोटी सामने जिंकले होते. त्याच्या विजयाची टक्केवारी ६२.१६ होती.

६. कसोटी क्रिकेटमध्ये निवृत्ती घेतल्यानंतर राहुल द्रविड इंडिया अंडर १९ आणि इंडिया ए संघाचा प्रशिक्षक बनला.

7. राहुलला लहानपणी हॉकी खेळायचे होते. त्याची कर्नाटक स्टेट ज्युनियर हॉकी संघासाठी निवड झाली होती.

८. राहुल द्रविडला अर्जुन अवॉर्ड आणि पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित कऱण्यात आले आहे. 

९. २००४-०५ मध्ये एका ऑनलाईन सर्व्हेमध्ये राहुल द्रविडला भारताचा सर्नात सेक्सी पुरुष असा खिताब मिळाला होता.