कर्णधारपद सोडा, टीममध्ये 'या' खेळाडूला स्थानंही नाही; Rahul Dravid यांनी कारकीर्द संपवल्याचा आरोप

या सिरीजमध्ये राहुल त्रिपाठीला पदार्पणाची संधी देण्यात आली आहे. 

Updated: Jun 16, 2022, 02:29 PM IST
कर्णधारपद सोडा, टीममध्ये 'या' खेळाडूला स्थानंही नाही; Rahul Dravid यांनी कारकीर्द संपवल्याचा आरोप title=

मुंबई : बुधवारी BCCI ने बुधवारी येत्या आयर्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा केली. 26 आणि 28 जून या कालावधीत होणाऱ्या आयर्लंडविरूद्ध भारत टी-20 सामन्यांसाठी BCCI ने टीमची घोषणा केली आहे. दरम्यान यावेळी गुजरात टायटन्सला पहिल्यावेळी प्रयत्नात जेतेपद पटकावून देणाऱ्या हार्दिक पांड्याकडे टीमच्या कर्णधारपदाची धुरा सोपवण्यात आली आहे. 

दरम्यान या सिरीजमध्ये राहुल त्रिपाठीला पदार्पणाची संधी देण्यात आली आहे. तर संजू सॅमसनचं पुनरागमन देखील होणार आहे. मात्र  या दौऱ्यात शिखर धवनचं नाव टीममध्ये नसल्याने त्याची टी-20 कारकीर्द संपल्यात जमा असल्याची चर्चा सुरू झालीये. 

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 5 टी-20 सामन्यांच्या सिरीजसाठी टीम निवडण्यापूर्वी सीनियर खेळाडूंच्या अनुपस्थितीत शिखऱ धवनकडे नेतृत्व सोपवलं जाईल, अशी चर्चा होती. मात्र प्रत्यक्षात धवनचा टीममध्ये समावेश केला गेला नाही.  दरम्यान यामागे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांना जबाबदार धरलं जातंय.

मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी स्वतः फोन करून धवनला टी-20 साठी त्याचा विचार केला जाणार नसल्याचं स्पष्ट सांगितलं होत. त्यामुळे द्रविडच्या त्या फोन कॉलमुळे धवनची टी-20 कारकीर्द संपुष्टात आल्याचं तेव्हाच स्पष्ट झालं होतं. आगामी टी-20 वर्ल्ड कप डोळ्यासमोर ठेवून भारतीय टीममध्ये प्रयोग होत असल्याचं दिसून येतंय.

दरम्यान टीम इंडियाच्या गब्बरचा भारताच्या टी-20 संघात स्थान न मिळाल्याने चाहतेही नाराज आहेत.