रचिन रविंद्र याने सर रिचर्ड हॅडली मेडल जिंकून रचला इतिहास!

रचिन रवींद्र याने वनडे वर्ल्ड कप 2023 मध्ये न्यूझीलंडसाठी अप्रतिम कामगिरी करत सर्वांची मनं जिंकली होती. रचिनने 10 सामन्यांत 64.22 च्या सरासरीने 568 धावा केल्या आहेत. वर्ल्ड कप 2023 मध्ये रचिन रवींद्रने केलेल्या उत्कृष्ट कामगिरीमुळे न्यूझीलंडची टीम उपांत्य फेरीपर्यंत पोहोचली होती. यामूळे रचीन याला या कामगिरीसाठी नूकताच पार पडलेल्या न्यूझीलंड क्रिकेट पुरस्कारांमध्ये वनडे प्लेयर ऑफ द इयर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

Updated: Mar 14, 2024, 06:21 PM IST
रचिन रविंद्र याने सर रिचर्ड हॅडली मेडल जिंकून रचला इतिहास!  title=

New Zealand cricket Awards : मागील वर्षी भारतात झालेल्या वनडे विश्वचषकात उत्कृष्ट कामगिरी केल्यामूळे रचिन रवींद्र याला न्यूझीलंड क्रिकेट पुरस्कारांमध्ये अनेक पुरस्कार मिळालेले आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये सतत रन करणाऱ्या रवींद्र याला बुधवारी न्यूझीलंडचा सर्वोत्तम क्रिकेटपटू म्हणून निवडण्यात आले आहे, त्याने दिग्गज खेळाडू केन विल्यमसनलाही मागे टाकले आहे. रचिन रवींद्र हा आगामी आयपीएल हंगामात चेन्नई सुपर किंग्जसाठी खेळणार आहे. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील संघाने त्याला IPL 2024 च्या लिलावात 1.80 कोटी रुपयांना खरेदी केले होते.
 

Rachin Ravindra: न्यूझीलंडचा नवोदित क्रिकेटपटू
 

रचिन रवींद्र याला न्यूझीलंडचा सर्वोत्कृष्ट पुरुष क्रिकेटपटू म्हणून मानाचा पूरस्कार मानल्या जाणाऱ्या सर रिचर्ड हॅडली मेडलने सन्मानित करण्यात आले आहे. रचिन रवींद्र हा पुरस्कार जिंकणारा सर्वात तरुण खेळाडू ठरलेला आहे. रवींद्र याने 2021 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते आणि आतापर्यंत त्याने कमालीची कामगिरी करत 7 कसोटी, 25 वनडे आणि 20 टी-20 सामन्यांमध्ये क्रमशः 519, 820 आणि 214 धावा केलेल्या आहेत. रचिन याने आपली जादू केवळ फलंदाजीतच नाही तर गोलंदाजीतही दाखवलेली आहे, त्याने आतापर्यंत 39 आंतरराष्ट्रीय विकेट्स घेतल्या आहेत.
 

2023 क्रिकेट विश्वचषकात केली होती चमकदार कामगिरी
 

न्यूझीलंडचा अनुभवी फलंदाज केन विल्यमसन दुखापतीमूळे वर्ल्ड कप 2023 च्या अनेक सामन्यांना मूकला होता, या कारणामूळेच विल्यमसनच्या जागी रवींद्रला चान्स दिला गेला आणि रचिनने या संधीचे सोने केले होते. वर्ल्ड कप 2023 मध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंमध्ये रचिन रविंद्रने चौथ्या क्रमांकावर होता. रवींद्रने नुकत्याच झालेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत 240 धावांची शानदार खेळी केली होती आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतसूद्धा त्याच्या बॅटने दोन खणखणीत अर्धशतके आली होती.
 

अमेलिया केर आणि केन विल्यमसन यांचासूद्धा पुरस्काराने सन्मान!

न्यूझीलंड क्रिकेट पुरस्कारांमध्ये अनेक खेळाडूंना त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीसाठी सन्मानित करण्यात आले आहे. अमेलिया केरला न्यूझीलंडची सर्वोत्तम महिला क्रिकेटपटू म्हणून निवडण्यात करून अमेलियाला डेबी हॉकले मेडल प्रदान करण्यात आलेले आहे. केर हिने महिला वनडे आणि महिला टी20 मध्येही उत्कृष्ट कामगिरी करून वुमन वनडे प्लेयर ऑफ द ईयर आणि वुमन टी20 प्लेयर ऑफ द ईयर पुरस्कारही जिंकले आहेत. तर, पुरुष क्रिकेटमध्ये, केन विल्यमसनला मेन्स टेस्ट प्लेयर ऑफ द ईयरचा पुरस्कार मिळाला आहे. विल्यमसनने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात 118 आणि 109 धावांच्या धमाकेदार इनिंग्स खेळल्या होत्या. टेस्ट मॅचच्या दोन्ही इनिंग्समध्ये शतक झळकावणारा तो पाचवा न्यूझीलंड फलंदाज बनला आहे. यानंतर दुसऱ्या कसोटी सामन्यातही विल्यमसनने शानदार शतक झळकावले होते.

याव्यतिरिक्त, न्यूझीलंड क्रिकेट पुरस्कारांमध्ये इतर अनेक पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.

रचिन रवींद्र याला न्यूझीलंड क्रिकेटर ऑफ द ईयर पुरस्कार मिळाला.
सूजी बेट्सला महिला वनडे क्रिकेटर ऑफ द ईयर पुरस्कार मिळाला.
ग्लेन फिलिप्स याला पुरुष टी20 क्रिकेटर ऑफ द ईयर पुरस्कार मिळाला.
एमिली क्लेरला न्यूझीलंड वुमन क्रिकेट इमर्जिंग प्लेयर ऑफ द ईयर पुरस्कार मिळाला.
फर्ग्युसन लियॉर्ड याला न्यूझीलंड मेन्स क्रिकेट इमर्जिंग प्लेयर ऑफ द ईयर पुरस्कार मिळाला.