'हा' स्टारकिड आहे इतरांपेक्षा वेगळा...कमवतोय एकावर एक मेडल्स

'या' बॉलिवूड सेलिब्रिटीचा मुलगा देशासाठी गोल्ड, सिल्वर मेडल जिंकतोय आणि जगात भारताचं नाव मोठं करतोय.

Updated: Apr 18, 2022, 03:49 PM IST
'हा' स्टारकिड आहे इतरांपेक्षा वेगळा...कमवतोय एकावर एक मेडल्स title=

मुंबईः गेल्या काही दिवसात अनेक स्टारकिड्स या ना त्या कारणाने सतत चर्चेत आहेत. कुणी बॉलिवूडमध्ये आपला डेब्यू करून चर्चेत आहेत तर कुणी लग्नामुळे चर्चेत आहे. 

कुणी ड्रग्जमुळे तर कुणी बोल्ड फोटो शूटमुळे. मात्र या सर्वांमध्ये एक नाव वेगळं आहे. ज्यावर कदाचित तुमचा विश्वास बसणार नाही.

बॉलिवूड सेलिब्रिटीचा मुलगा देशासाठी गोल्ड, सिल्वर मेडल जिंकतोय आणि जगात भारताचं नाव मोठं करतोय. हा सेलिब्रिटी दुसरा-तिसरा कोणी नसून तो आहे आर.माधवनचा मुलगा वेदांत माधवन.

वेदांतने डॅनिश ओपन 2022च्या स्विमिंग चॅम्पियनशिपमध्ये देशासाठी सुवर्णपदक जिंकलं आहे. याआधी वेदांतने जलतरण स्पर्धेत रौप्यपदक पटकावले होते आणि आता वेदांतने सुवर्णपदक जिंकून देशाची मान उंचावली आहे.

आर. माधवनने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत ही माहिती दिली आहे. माधवनने त्याच्या या यशामागे असलेल्या लोकांचे आभार मानले आहेत. या फोटोत वेदांत सुवर्णपदक दाखवताना दिसत आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by R. Madhavan (@actormaddy)

वेदांतने 800 मीटरमध्ये 8:17.28 सेकंदात अंतर पूर्ण करून सुवर्णपदक कमावलं आहे. त्यामुळे वेदांत माधवन सर्व स्टारकिड्सपेक्षा वेगळा ठरला आहे.

वेदांतने जलतरण स्पर्धेत पदक जिंकण्याची ही पहिलीच वेळ नाही. गेल्या वर्षी, 16 वर्षीय जलतरणपटूने बेंगळुरू येथे झालेल्या 47व्या ज्युनियर नॅशनल ऍक्वाटिक चॅम्पियनशिपमध्ये चार रौप्य पदके

आणि तीन कांस्यपदके जिंकली होती.  याआधी गेल्या वर्षी मार्चमध्ये, वेदांतने लॅटव्हियन ओपन स्विमिंग चॅम्पियन्स स्पर्धेत कांस्यपदक जिंकले होतं.

ड्रग्ज प्रकरणात आर्यन खान जेलमध्ये गेल्यानंतर वेदांत माधवनच्या कामाची तुलना खऱ्या अर्थाने इतर स्टार किडसोबत केली गेली होती. तेव्हा वेदांतचं नेटकऱ्यांची खूपच कौतुक केलं होतं.