R Madhavan Son Vedaant Khelo India Youth Games : बॉलिवूडचा दिग्गज अभिनेता आर.माधवन याचा मुलगा वेदांत (R Madhavan Son Vedaant) स्पोर्टसमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत असतो. अशीच कामगिरी आता त्याने 'खेलो इंडिया युथ गेम्स'मध्ये (Khelo India Youth Games)केली आहे. या स्पर्धेत त्याने महाराष्ट्रासाठी 5 सुवर्ण आणि 2 रौप्य पदके जिंकली आहेत. मुलाच्या या अभिमानास्पद कामगिरीनंतर आर.माधवनने ट्विट करत आनंद व्यक्त केला आहे.
देशात 'खेलो इंडिया युथ गेम्स 2023' (Khelo India Youth Games) ही स्पर्धा खेळवली जात आहे. या स्पर्धेत प्रत्येक राज्यातील खेळाडू सहभागी झाले आहेत. अभिनेता आर माधवनचा मुलगा वेदांत (R Madhavan Son Vedaant) देखील महाराष्ट्राकडून ( Maharashtra) खेळत आहे. वेदांतने महाराष्ट्राकडून खेळताना 7 पदकांची लयलूट केली आहे. वेदांतने या गेममध्ये 5 सुवर्ण आणि 2 रौप्य पदके जिंकली आहेत. मुलाच्या या यशावर आर. माधवनच्या (R Madhavan) आनंदाला पारावार उरला नाही. सोशल मीडियावर सर्व खेळाडूंच्या विजयाचे अभिनंदन करताना त्याने मुलगा वेदांतसाठी दोन शब्दही लिहिले आहेत.
आर माधवनने (R Madhavan) ट्विटरवर मुलगा वेदांतचे (Vedaant)काही फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये तो जिंकलेले पदक लटकवताना आणि हातात ट्रॉफी धरलेला दिसत आहे. यासोबतच वेदांतने कोणत्या स्पर्धेत कोणती पदकं जिंकली आहेत, याची देखील माहिती दिली आहे.
With gods grace -Gold in 100m, 200m and 1500m and silver in 400m and 800m . pic.twitter.com/DRAFqgZo9O
— Ranganathan Madhavan (@ActorMadhavan) February 12, 2023
वेदांतने (Vedaant) 100 मीटर, 200 मीटर आणि 1500 मीटरमध्ये सुवर्णपदक जिंकले, तर 400 मीटर आणि 800 मीटर जलतरणात रौप्यपदक जिंकले आहे, असे आर माधवनने ट्विटमध्ये लिहले आहे. तर दुसर्या ट्विटमध्ये, अपेक्षा फर्नांडिस आणि वेदांतसह सर्वांची कामगिरी पाहून खूप आनंद झाला आहे. त्याला खूप अभिमान वाटत आहे, असे त्याने लिहले.
VERY grateful & humbled by the performances of @fernandes_apeksha ( 6 golds,1 silver,PB $ records)& @VedaantMadhavan (5golds &2 silver).Thank you @ansadxb & Pradeep sir for the unwavering efforts & @ChouhanShivraj & @ianuragthakur for the brilliant #KheloIndiaInMP. So proud pic.twitter.com/ZIz4XAeuwN
— Ranganathan Madhavan (@ActorMadhavan) February 12, 2023
'खेलो इंडिया युथ गेम्स'मध्ये (Khelo India Youth Games) वेदांतने महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले होते. महाराष्ट्र संघाने ही स्पर्धा जिंकून ट्रॉफी उंचावली होती. या सोबत मुलांच्या संघानेही जलतरणात ट्रॉफी जिंकली. आर. माधवनचा मुलगा वेदांतही जलतरणपटू आहे. गेल्या वर्षी जुलैमध्ये झालेल्या ज्युनियर राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत त्याने 1500 मीटर फ्रीस्टाईलमध्ये राष्ट्रीय विक्रम केला होता.
दरम्यान एकीकडे इतक स्टारकिड्स (Starkids) बॉलिवूडमध्ये आपलं नशीब आजमावत असताना आर. माधवनचा मुलगा मात्र स्पोर्टसमध्ये उत्कृष्ट करीअर करत आहे.