सुवर्णपदकाला हुलकावणी दिल्यानंतर सिंधूने व्यक्त केले आपले मत !

स्वित्झर्लंडच्या ग्लास्गो शहरात सुरु असलेल्या जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या पी.व्ही. सिंधूला रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं आहे. 

Darshana Pawar Darshana Pawar | Updated: Aug 28, 2017, 05:58 PM IST
सुवर्णपदकाला हुलकावणी दिल्यानंतर सिंधूने व्यक्त केले आपले मत ! title=

ग्लास्गो : स्वित्झर्लंडच्या ग्लास्गो शहरात सुरु असलेल्या जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या पी.व्ही. सिंधूला रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं आहे. यावेळी तिने सांगितले की, "मी दुःखी आहे. तिसऱ्या डावात २०-२० अशा बरोबरीत असताना हा सामना कोणीही जिंकू शकलं असतं. दोघांचे लक्ष्य सुवर्णपदकाकडे लागलेले असताना अचानक शेवटच्या काही क्षणात खेळ बदलला."

सामना अतिशय कठीण :
तिने सांगितले की, नोझुमी ओकुहाराला हरवणे सोपे नव्हते. खेळ सोपा नव्हता. तो खूप कठीण होता. मी ही जिद्दीने खेळले. एकही शटल सोडला नाही. मी खूप वेळ खेळण्यासाठी देखील तयार होते. पण तो माझा दिवस नव्हता." १ तास ४९ मिनिटांपर्यंत चाललेल्या या मॅचबद्दल तिने सांगितले की, "हा सामना मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या खूप कठीण होता." टुर्नामेंटमधील सगळ्यात जास्त वेळ चालणारा हा सामना होता. 

भारतीय जनता समाधानी :

भारतीय जनता समाधानी :सिंधूने सांगितले की, "जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपदाचा अंतिम सामना भारतीयांसाठी समाधानकारक होता. सायना आणि सिंधू यांच्या खेळामुळे भारताला मिळालेल्या दोन्ही पदकांचा भारतीयांना अभिमान आहे. त्याचबरोबर माझ्या देशासाठी पदक जिंकल्याचा मला देखील अभिमान आहे. यामुळे मला आत्मविश्वास मिळाला असून मी भविष्यात देशासाठी अधिकाधिक पदके जिंकेन."