RR Vs PBKS: जिंकता जिंकता हरली राजस्थान रॉयल्स; पंजाबचा सलग दुसरा विजय

राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनने प्रथम टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र हा निर्णय त्यांच्यासाठी फायदेशीर ठरला नाही. पंजाबच्या ओपनर्सने राजस्थानच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली.

Updated: Apr 5, 2023, 11:57 PM IST
RR Vs PBKS: जिंकता जिंकता हरली राजस्थान रॉयल्स; पंजाबचा सलग दुसरा विजय title=

RR Vs PBKS: आयपीएलच्या (IPL 2023) आठव्या सामन्यात आज राजस्थान रॉयल्स विरूद्ध पंजाब किंग्स (Rajasthan Royals vs Punjab Kings) यांच्यात सामना रंगला होता. अखेर या सामन्यात पंजाबने बाजी मारली. पंजाबने 5 रन्सने राजस्थानवर विजय मिळवला आहे. 192 रन्समध्ये पंजाबच्या गोलंदाजांनी राजस्थानला गुंडाळलं. हा पंजाब किंग्सचा हा सलग दुसरा विजय होता. 

पंजाबकडून राजस्थानला 198 रन्सचं आव्हान

राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनने प्रथम टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र हा निर्णय त्यांच्यासाठी फायदेशीर ठरला नाही. पंजाबच्या ओपनर्सने राजस्थानच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. 90 रन्सवर पंजाबची पहिली विकेट गेली. पंजाबकडून प्रभसिमरन सिंहने 60 रन्सची खेळी केली. तर त्याच्याशिवाय शिखर धवनने नाबाद 86 रन्सची खेळी केली. तर जितेश शर्मानेही 27 रन्सचं योगदान दिलं.

शिखर धवनची कॅप्टन इनिंग 

आजच्या सामन्यात मैदानावर शिखर धवन नावाचं तुफान पहायला मिळालं. धवनने 56 बॉल्समध्ये नाबाद 86 रन्स केले. यामध्ये त्याने 9 फोर आणि 3 सिक्स ठोकले. 153.57 च्या स्ट्राईक रेटने धवनने आज फलंदाजी केली. त्याच्या या खेळीच्या जोरावर पंजाबने इतका मोठा स्कोर उभा केला.

राजस्थानचे फलंदाज अपयशी

198 रन्सच्या लक्ष्याचा पाठलाग करताना राजस्थानची टीम जेव्हा मैदानात उतरली तेव्हा एक बजल पहायला मिळाला. आजच्या सामन्यात रविचंद्रन अश्विन ओपनिंगसाठी फलंदाजी करायला आला होता. मात्र हा बदल पूर्णपणे फेल झाला. 4 बॉल्समध्ये अश्विनला एकंही रन करता आला नाही. 

जॉस बटलर आणि कर्णधार संजू सॅमसन क्रिजवर असताना राजस्थानचा विजय होईल अशी शक्यता व्यक्त करण्यात येत होती. मात्र 19 रन्सवर बटलर माघारी परतला. त्यानंतर 42 रन्सवर देखील संजू सॅमसनही आऊट झाला. सामना कठीण होत असताना हेटमायरने चांगले शॉट खेळले, मात्र त्याला टीमला विजय मिळवून देता आला नाही. 

कशी होती प्लेईंग 11

पंजाब किंग्स 

शिखर धवन (कर्णधार), प्रभसिमरन सिंह, भानुका राजपक्षे, जितेश शर्मा (विकेटकीपर), शाहरुख खान, सैम कुरेन, हरप्रीत बरार, राहुल चहर, अर्शदीप सिंह, सिकंदर रजा, नाथन एलिस

राजस्थान रॉयल्स 

यशस्वी जयस्वाल, जॉस बटलर, संजू सॅमसन (विकेटकीपर), देवदत्त पडिक्कल, रियान पराग, शिमरोन हेटमायर, केएम आसिफ, युझवेंद्र चहल, जेसन होल्डर, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट,