VIDEO: शरीरसौष्ठव स्पर्धेत 'त्या' आल्या आणि सर्वांचीच मनं जिंकली

भारतीय शरीरसौष्ठवाची ताकद दाखवणाऱ्या 'भारत श्री' स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत पीळदार करामत पाहायला मिळाली. शरीरसौष्ठवाच्या पुंभमेळ्यात शरीरसौष्ठवपटूंचा विक्रमी सहभाग लाभला, पण त्यात महिला शरीरसौष्ठवपटूंचाही सिंहाचा वाटा होता.

Updated: Mar 25, 2018, 06:35 PM IST
VIDEO: शरीरसौष्ठव स्पर्धेत 'त्या' आल्या आणि सर्वांचीच मनं जिंकली title=

पुणे : भारतीय शरीरसौष्ठवाची ताकद दाखवणाऱ्या 'भारत श्री' स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत पीळदार करामत पाहायला मिळाली. शरीरसौष्ठवाच्या पुंभमेळ्यात शरीरसौष्ठवपटूंचा विक्रमी सहभाग लाभला, पण त्यात महिला शरीरसौष्ठवपटूंचाही सिंहाचा वाटा होता. महिलांच्या शरीरसौष्ठव स्पर्धेत आठ पीळदार महिलांची उपस्थिती स्फूर्तीदायक होतीच. पण महिलांनाही अभिमान वाटावा, असा प्रतिसाद महिलांच्या स्पोर्ट्स मॉडेल गटात पाहायला मिळाला.

(व्हिडिओ पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा)

महिलांच्या स्पोर्ट्स मॉडेल गटात देशभरातून आलेल्या ३५ महिला खेळाडूंची पीळदार देहयष्टी आणि सुडौल बांधा पाहून सारेच थक्क झाले.

भारतात बिकीनीवर येऊन आपल्या पीळदार शरीराचे प्रदर्शन आपल्या संस्कृतीच्या विरोधी मानले जात होते. मात्र, आता काळानुसार पुरूंषाप्रमाणे महिलांच्याही मानसिकतेत बदल झाल्याचे चित्र आता पाहायला मिळू लागले आहे.

महिलांची शरीरसौष्ठवात क्रांती

शरीरसौष्ठवात महिलांचा सहभाग वाढावा म्हणून आता त्यांचे कुटुंबीयही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू लागले आहेत. त्याचमुळे मॉडेल स्पोर्ट्स सारख्या प्रकारात ३५ महिलांची उपस्थितीही शरीरसौष्ठवात एक क्रांतीच म्हणावी लागेल. या स्फूर्तीदायक उपस्थितीमुळे येणाऱ्या काळात शरीरसौष्ठवाकडे महिलांची पावले वेगाने पडतील, असा विश्वास भारतीय शरीरसौष्ठव संघटनेचे सरचिटणीस चेतन पाठारे यांनी व्यक्त केला.

'या' खेळाडूंची अंतिम फेरीत धडक

या ३५ खेळाडूंपैकी सात खेळाडू या महाराष्ट्राच्याच होत्या. तसेच या गटात मध्यप्रदेश, पश्चिम बंगाल आणि मणिपूरच्याही महिला खेळाडूंची उपस्थिती लक्षणीय होती. या ३५ खेळाडूंमधून अंतिम फेरीसाठी दहा खेळाडू निवडताना जजेसना फार काळजी घ्यावी लागली. जेतेपदासाठी रंगणाऱ्या लढतीत महाराष्ट्राच्या रिता तारी, मंजिरी भावसार आणि स्टेला गोडे या मुलींनी अंतिम फेरीत धडक मारली आहे.

या गटाच्या संभाव्य विजेत्यांच्या यादीत कर्नाटकची अंकिता यादव, मणिपूरची जानसी देवी, मेघालयची क्लॉडिया जेसिका आघाडीवर आहेत. याच गटात पन्नाशी ओलांडलेल्या महाराष्ट्राच्या निशरीन पारिख आणि मध्य प्रदेशच्या सीमा वर्मा यांचे पीळदार सौंदर्य पाहून उपस्थित क्रीडाप्रेमींनी भरभरून दाद दिली.

महिला शरीरसौष्ठव : 

  • जमुना देवी (मणिपूर)
  • ज्योती (दिल्ली) 
  • सरिता देवी (मणिपूर) 
  • ममोता देवी यमनम (दिल्ली)
  • कांची अडवाणी (महाराष्ट्र अ) 
  • गीता सैनी (हरयाणा) 
  • रेखा कुमार (छत्तीसगड) 
  • वंदना ठाकूर (मध्य प्रदेश)

स्पोर्टस् मॉडेल (महिला) : 

  • संजु (उत्तर प्रदेश) 
  • एम. जानसी देवी (मणिपूर) 
  • अंकिता सिंग (कर्नाटक) 
  • रिता तारी (महाराष्ट्र अ) 
  • हाशी रॉय (कर्नाटक) 
  • स्टेला गोडे(महाराष्ट्र अ) 
  • क्लॉडिया जेसिका (मेघालय) 
  • मंजिरी भावसार (महाराष्ट्र अ) 
  • अनन्या घोषाल (प. बंगाल)
  • सोनिया मित्रा (प.बंगाल)

'भारत श्री' स्पर्धेत महाराष्ट्राचे २० बाहुबली पदकांच्या शर्यतीत