बडा पछताओगे! शोएबची मॅच पाहायला आलेली तिसरी पत्नी सना ट्रोल, स्टेडयमध्ये काय झालं? पाहा VIDEO

Shoaib Maliks wife Sana Javed Troll: पाकिस्तान सुपर लीगचा (पीएसएल) सामना पाहण्यासाठी स्टेडियममध्ये पोहोचलेल्या शोएब मलिकची तिसरी पत्नी सना जावेदला चाहत्यांनी दिलेल्या त्रासाला सामोरे लागले.

Pravin Dabholkar | Updated: Feb 20, 2024, 09:30 PM IST
बडा पछताओगे! शोएबची मॅच पाहायला आलेली तिसरी पत्नी सना ट्रोल, स्टेडयमध्ये काय झालं? पाहा VIDEO title=
Shoaib Maliks wife Sana Javed Troll

Shoaib Maliks wife Sana Javed Troll: भारतीय टेनिस स्टार सानिया मिर्झाला घटस्फोट देऊन पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिकने वेगळी चूल मांडली. पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेदसोबत त्याने तिसरं लग्न केलं. यामुळे दोघांच्या फॅन्सना मोठा धक्का बसला. सानिया मिर्झाच्या भारतातील चाहत्यांसाठी हा मोठा धक्का होता. यावरुन नेहमी सानिया मिर्झाला सहानभूती तर शोएब मलिकला ट्रोल केलं जातं. त्यात शोएबची तसरी पत्नी सनालादेखील सोशल मिडियावर ट्रोल व्हाव लागत.

भारतातल्या आयपीएलप्रमाणे पाकिस्तानात पीएसएल क्रिकेट लीग सुरु आहे.  शोएब मलिकची नवी पत्नी सना जावेद येथे मॅच पाहण्यास पोहोचली होती. तिथला एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मॅच सुरु असताना स्टेडियममधून ती आपला पती शोएबला चीअर करतेय पण तिला पाहून इतरांनी ट्रोलिंग सुरु केले आहे. सनाला पाहताच चाहत्यांनी सानियाच्या नावाने घोषणाबाजी केली. तिला चिडवण्याचा प्रयत्न केला. 

सना जावेदला पाहताच चाहत्यांनी 'सानिया सानिया' घोषणा दिल्या. पाकिस्तान सुपर लीगचा (पीएसएल) सामना पाहण्यासाठी स्टेडियममध्ये पोहोचलेल्या शोएब मलिकची तिसरी पत्नी सना जावेदला चाहत्यांनी दिलेल्या त्रासाला सामोरे लागले. याचा एक व्हिडीओ सोशल मीडियामध्ये व्हायरल होतोय. यामाध्ये स्टेडियममध्ये बसलेले चाहते सनाकडे पाहून सानिया, सानिया म्हणताना दिसत आहे. सनाला हे अजिबात अपेक्षित नव्हते. त्यामुळे सनाचा चेहऱ्यावरील हावभाव बदलले. आणि ती चिडवणाऱ्या व्यक्तींकडे बघत शांतपणे तिथून निघून जाताना दिसली.

पीएसएलमध्ये कराची किंग्स विरुद्ध मुलतान सुलतान्स यांच्यात रंगतदार सामना झाला. या सामन्यात शोएब मलिकने मुलतान सुलतान विरुद्ध चमकदार कामगिरी केली होती. 35 चेंडूंमध्ये शोएब मलिकने 53 धावा केल्या. असे असतानाही शोएबची टीम कराची किंग्जला पराभूत झाली. मुलतान सुलतानने हा सामना 53 धावांनी जिंकला. एकंदरित शोएबसाठी आजचा दिवस अनलकी ठरला.

सना जावेदशी तिसरे लग्न केल्यानंतर शोएब मलिकची भारतातही चर्चा होऊ लागली.  गेल्या महिन्यात 20 जानेवारीला शोएबने सनासोबत लग्न करून सर्वांना आश्चर्यचकित केले होते. सनापूर्वी शोएबची दुसरी पत्नी सानिया मिर्झा होती. दोघांनी 2010 मध्ये एकमेकांशी लग्न केले. त्यांचा सुखाचा संसार सुरु होता. ते दोघेही अनेक मुलाखतीमध्ये आपल्या सुखी संसाराच्या गोष्टी सांगत असत. त्यांना एक मुलगादेखील आहे. मात्र 14 वर्षांनंतर त्यांच्या सुखी संसारात मतभेद निर्माण झाले. 2022 पासून त्यांच्यात घटस्फोटाच्या अफवा उडू लागल्या. दोघांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर वरुन एकमेकांचे फोटो डिलीट करण्यात आले. त्यामुळे घटस्फोटाची चर्चा झाली पण दोघेही अधिकृतपणे याबद्दल बोलत नव्हते. मात्र या वर्षी दोघेही एकमेकांपासून वेगळे झाले. त्यानंतर शोएबने सनासोबतच्या निकाहचे फोटो सोशल मीडियात टाकल्यानंतर सानियाच्या घटस्फोटावर शिक्कामोर्तब झाले.