सिडनी : ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात झालेल्या तिसऱ्या वन-डे मॅचमध्ये एक विचित्र प्रकार पहायला मिळाला.
IPL 11च्या तारखांची घोषणा, मुंबईत होणार पहिली मॅच
इंग्लंडने ही मॅच जिंकून ऑस्ट्रेलियाचा ३-०ने पराभव केला. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेल्या तिसऱ्या वन-डे मॅचमध्ये एक अशी कॅच घेण्यात आली जी पाहून बॅट्समनसोबतच सर्वांनाच आश्चर्य वाटलं.
सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर रविवारी ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात तिसरी वन-डे मॅच खेळली गेली. ही मॅच इंग्लंडच्या टीमने १६ रन्सने मॅच जिंकली.
या मॅचमध्ये प्रथम बॅटिंगसाठी मैदानात उतरलेल्या इंग्लंडच्या टीमने ३०२ रन्स बनवले. त्यानंतर या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या ऑस्ट्रेलियन टीम २८६ रन्सवर गारद झाली.
ऑस्ट्रेलियन बॅट्समन अॅरोन फिंचने या मॅचमध्ये एक जबरदस्त शॉट खेळला. त्यानंतर हा बॉल थेट बाऊंड्री लाईनबाहेर बसलेल्या पोलिसाच्या हातात जाऊन बसला.
झालं असं की, हा पोलीस कर्मचारी बाऊंड्री लाईनबाहेर तैनात होता. त्याच दरम्यान १९.३ व्या ओव्हरमध्ये फिंचने एक जबरदस्त शॉट खेळला. त्यानंतर बाऊंड्री बाहेर खुर्चीवर बसलेल्या पोलीस कर्मचाऱ्यानेच त्याची कॅच पकडली.
या दरम्यान, ग्राऊंडवर लावण्यात आलेल्या मोठ्या स्क्रिनवर पोलीस कर्मचाऱ्याने कॅच पकडताना प्रेक्षकांनी पाहीलं. हे दृश्य पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटलं.