पंतप्रधानांनी खेळाडूंना दिली ही पंचसुत्री, जाणून घ्या

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आजी-माजी खेळाडूंशी व्हिडीओ कॉन्फरंसींगद्वारे संवाद साधला. 

Updated: Apr 3, 2020, 11:35 PM IST
पंतप्रधानांनी खेळाडूंना दिली ही पंचसुत्री, जाणून घ्या  title=

नवी दिल्ली : कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभुमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आजी-माजी खेळाडूंशी व्हिडीओ कॉन्फरंसींगद्वारे संवाद साधला. या कठीण काळात जनतेमध्ये सकारात्मका पसरवण्याचे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी यावेळी खेळाडूंना केले. 

कोरोनाची जगभरात इतकी झळ पोहोचली आहे की विंम्बल्डन स्पर्धा, इंडीयन प्रिमियर लिग पुढे ढकलावी लागली. तुम्ही तुमच्या खेळातील महत्वाचा चेहरा आहात. देशाचे प्रतिनिधी या नात्याने तुम्ही लॉकडाऊन पाळण्याचे आवाहन जनतेला करा असे त्यांनी यावेळी खेळाडूंना सांगितले. स्वयंशिस्त, सकारात्मकता, स्वसंरक्षण, स्वत:वरचा विश्वास या गोष्टी खेळाडूंकडे असतात असेही ते म्हणाले.

यातून बाहेर पडण्याचा 'संकल्प', सोशल डिस्टंसिंगसाठी 'संयम', आपण यातून बाहेर पडू हा विश्वास 'सकारात्मकता', आरोग्यसेवकांप्रती 'सन्मान', पंतप्रधान निधीसाठी 'सहयोग' ही पंचसुत्री पंतप्रधानांनी यावेळी दिली. 

यावेळी खेळाडूंनी पंतप्रधानांचे तसेच आरोग्य कर्मचाऱ्यांचे धन्यवाद मानले.

भारतरत्न सचिन तेंडूलकर, बीसीआय अध्यक्ष सौरभ गांगुली, महिला हॉकी टीम कॅप्टन राणी रामपाल, बॅडमिंटन प्लेयर पी.व्ही.सिंधू, कब्बडी प्लेयर अजय ठाकूर, टेनिस प्लेयर अंकिता रैना, क्रिकेटर युवराज सिंग, विराट कोहली यांच्यासह चाळीसहून अधिकजण या व्हिडीओ कॉन्फरंन्सिंगमध्ये सहभागी होते.