'हात जोडतो प्लीज...', अंबाती रायडूला 'जोकर' म्हणणाऱ्या Kevin Pietersen ने केला खुलासा, म्हणतो 'मी तर फक्त...'

Kevin Pietersen Statement On Ambati Rayudu : लाईव्ह कार्यक्रमात विराटला डिवचणाऱ्या अंबाती रायडूला केविन पीटरसनने जोकर (joker) म्हटलं होतं. त्यावर आता पीटरसनने स्पष्टीकरण दिलंय.

सौरभ तळेकर | Updated: May 28, 2024, 08:29 PM IST
'हात जोडतो प्लीज...', अंबाती रायडूला 'जोकर' म्हणणाऱ्या Kevin Pietersen ने केला खुलासा, म्हणतो 'मी तर फक्त...' title=
Kevin Pietersen On Ambati Rayudu

Kevin Pietersen On Ambati Rayudu : कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद (KKR vs SRH IPL Final) यांच्यात झालेल्या सामन्यानंतर अंबाती रायडूने विराट कोहलीवर (Virat Kohli) नाव न घेता टीका केली होती. ऑरेंज कॅप जिंकल्याने आयपीएल जिंकता येत नाही, असं रायडू (Ambati Rayudu) म्हणाला होता. त्यावरून समालोचक सुरू असताना समोर उभा असलेल्या केविन पीटरसनने (Kevin Pietersen) 'यू आर जोकर' म्हणत अंबाती रायडूची थट्टा केली होती. विराटच्या फॅन्सने हा व्हिडीओ (Viral Video) सोशल मीडियावर तुफान व्हायरल केला होता. त्यावर आता केविन पीटरसनने स्पष्टीकरण दिलंय.

काय म्हणाला Kevin Pietersen ?

मित्रांनो, एखाद्या इंडियन प्लेयरची खिल्ली उडवणं बंद करा. आयपीएल फायनलनंतर अंबाती रायडू आणि मी समालोचन करत असताना आमचं बोलणं टोकाला गेलं. त्यावेळी आम्ही एकमेकांची मस्करी केली. मात्र, मस्करी अचानक गैरवर्तनात बदलली, त्यामुळे कृपया तुम्ही खिल्ली उडवणं बंद करा, असं स्पष्टीकरण केविन पीटरसनने (Kevin Pietersen On Ambati Rayudu) दिलं आहे.

नेमकं काय म्हणाला होता Ambati Rayudu?

केकेआरने सुनील नारायण, आँद्रे रसेल आणि स्टार्कसारख्या दिग्गजांच्या पाठीशी उभं राहिल्याबद्दल संघाचं कौतूक करायला हवं. या तिन्ही खेळाडूंनी महत्त्वाच्या सामन्यात विजय मिळवून देण्यात महत्त्वाचं योगदान दिलंय. अशा प्रकारे एखाद्या संघाला आयपीएल जिंकता येते. आपल्याला याचा प्रत्यय अनेकदा पहायला मिळतो. आयपीएलमध्ये ऑरेंज कॅप मिळवल्याने तुम्हाला चॅम्पियन बनता येत नाही. त्यासाठी प्रत्येक खेळाडूला योगदान द्यावा लागतं, असं अंबाती रायडू म्हणाला होता.

दरम्यान, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचे फॅन्स कित्येक वर्षांपासून आपल्या संघाला सपोर्ट करतायेत. जर आरसीबीच्या मॅनेजमेंट आणि संघाच्या लीडर्सने आपले वैयक्तिक रेकॉर्ड्स बाजूला ठेवले असते, तर या संघाने आतापर्यंत कितीतरी ट्रॉफी जिंकल्य असत्या. कितीतरी चांगले खेळाडूंना या फ्रँचायझीने जाऊ दिले. संघाच्या मॅनेजमेंटवर दबाव टाकला गेला असता तर संघाने खुप चांगली केली असती, असंही अंबाती रायडू याने म्हटलं होतं.