India vs New Zealand: कसं असेल दुसऱ्या टी-20 सामन्यासाठी प्लेइंग 11?

भारत विरूद्ध न्यूझीलंड यांच्यातील दुसरा टी-20 सामना आज रंगणार आहे. 

Updated: Nov 19, 2021, 07:46 AM IST
India vs New Zealand: कसं असेल दुसऱ्या टी-20 सामन्यासाठी प्लेइंग 11? title=

रांची : भारत विरूद्ध न्यूझीलंड यांच्यातील दुसरा टी-20 सामना आज रंगणार आहे. पहिल्या सामन्यात विजय मिळवल्यानंतर दुसऱ्या सामना जिंकण्याचा निर्धार कर्णधार रोहित शर्माने ठेवला आहे. रांचीच्या जेएससीए इंटरनेशनल स्टेडियमवर हा दुसरा टी-20 सामना रंगणार आहे. 

विजयी आघाडी मिळवणार भारत

जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या पहिल्या T-20 सामन्यात टीम इंडियाने न्यूझीलंडचा 5 गडी राखून पराभव केला. भारत सध्या मालिकेत 1-0 ने आघाडीवर आहे. टीम इंडियाला शुक्रवारचा सामना जिंकून 2-0 अशी अभेद्य आघाडी मिळवायची आहे.

रोहित शर्मा घेणार मोठा निर्णय!

टीम इंडियाने शेवटचा T-20 आंतरराष्ट्रीय सामना जिंकला असेल, पण अशा काही चुका समोर आल्या आहेत ज्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. काही गोलंदाज टीमसाठी फार घातक ठरले. त्यामुळे दुसऱ्या टी-20 सामन्यात रोहित शर्मा मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे.

रोहित शर्मा कापणार या 2 प्लेअर्सचा पत्ता!

जयपूरच्या टी-20 सामन्यांमध्ये मोहम्मद सिराज आणि दीपक चाहर टीमसाठी फार घातक ठरले होते. सिराजने त्याच्या 4 ओव्हर्समध्ये 9.75 इकोनॉमी रेटने 39 रन्स दिले होते. तर दीपकने 10.50च्या इकोनॉमी रेटने 42 रन्स दिले होते. त्यामुळे या 2 खेळाडूंना आराम दिला जाण्याची शक्यता आहे. 

हे प्लेअर्स करू शकतात डेब्यू

टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा रांचीमध्ये खेळल्या जाणाऱ्या टी-20 सामन्यात हर्षल पटेल आणि आवेश खान यांना खेळण्याची संधी देऊ शकतो. या दोघांचाही हा डेब्यू सामना असेल. या दोघांनीही आयपीलएलमध्ये चांगली कामगिरी केली होती