मुंबई: कोरोनाचं संकट अत्यंत भयंकर आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन आणि बेड्सची कमतरता निर्माण झाली आणि त्यामुळे अनेक समस्या उद्भवल्या. राजस्थान संघातील चेतन साकरियाच्या वडिलांचं नुकतंच कोरोनामुळे निधन झालं. त्यापाठोपाठ आता लेग स्पिनर पीयूष चावलाच्या वडिलांचं कोरोनामुळे निधन झालं आहे.
लेग स्पिनर पीयूष चावलाने याची माहिती इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करून दिली आहे. 'माझे वडील प्रमोद चावला यांचा कोरोनाशी लढा 10 मे रोजी अपयशी ठरला. त्यांनी कोरोनामुळे होणारा त्रास खूप सहन केला. त्यांना कोरोनावर मात करण्यात अपयश आलं अशी माहिती पीयूषने दिली आहे. मुंबई इंडियन्स फ्रांचायझीने पीयूषच्या वडिलांचं निधन झाल्याचं वृत्त आपल्या सोशल मीडियावर ट्वीट करून दिलं आहे.
Our thoughts go out to Piyush Chawla who lost his father, Mr. Pramod Kumar Chawla this morning.
We are with you and your family in this difficult time. Stay strong. pic.twitter.com/81BJBfkzyv
— Mumbai Indians (@mipaltan) May 10, 2021
भारतीय क्रिकेट टीमचे माजी ऑलराऊंडर खेळाडू इरफान पठान यांनी ट्वीट करून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. 9 मे रोजी राजस्थान रॉयल्स संघातील चेतन साकरियाच्या वडिलांचं कोरोनामुळे निधन झालं होतं.
IPLच्या बायो बबलमध्ये कोरोना घुसल्यानंतर 6 जणांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आल्यामुळे IPLतात्पुरतं स्थगित करावं लागलं. तर आर अश्विनच्या कुटुंबावर देखील कोरोनाचं संकट ओढवल्यानं त्याने IPLमधून ब्रेक घेतला होता.
महाराष्ट्रात लॉकडाऊन 15 मे नंतरही कायम राहण्याची शक्यता आहे. कोरोनाची रुग्ण संख्या अजूनही कमी झालेली नाही. दररोज होणारी मोठी वाढ कायम आहे. त्यामुळे राज्यात आणखी १५ दिवस लॉकडाऊन वाढू शकतो.