बॅटमिंटन लीग ३ च्या लिलावाला सुरूवात

वोडाफोन प्रिमियर लीगच्या (पीबीएल) लिलावाला आजपासून सुरूवात झाली आहे.

Updated: Oct 9, 2017, 02:43 PM IST
बॅटमिंटन लीग ३ च्या लिलावाला सुरूवात  title=

मुंबई : वोडाफोन प्रिमियर लीगच्या (पीबीएल) लिलावाला आजपासून सुरूवात झाली आहे.

पीबीएलच्यामध्ये पीव्ही सिंधू, सायना नेहवाल आणि के श्रीकांत त्यांच्या जुन्या टीमसोबतच खेळणार आहे. पी वी सिंधू चैन्नई स्मॅशर्स, सायना नेहवाल आणि के श्रीकांत अवध वॉरियर्स टीमद्वारा खेळणार आहे. 

पीबीएलच्या लिलावामध्ये यावर्षी जगभरातील १२० खेळाडूंचा समावेश झाला आहे. खेळाडूंवर नेमकी किती रूपयांची बोली लागली आहे याबाबत अजूनही खुलासा करण्यात आलेला नाही. 

प्रत्येक फ्रेंचाइजीसला आपल्या टीमवर २.१२ करोड रूपये खर्च करण्याची मुभा आहे. एका खेळाडूसाठी जास्तीत जास्त ७१ लाख रूपये खर्च करता येऊ शकतात. यंदा विजेत्यांना सुमारे सहा करोड रूपये मिळणार आहेत. 

बोली लागलेल्या खेळाडूंपैकी १० जण ऑलंपिक विजेते आहेत. यंदा चीन खेळाडूंचाही सहभाग होणार आहे. वोडाफोन प्रिमियर लीगच्या यंदाच्या पर्वामध्ये ८ टीम्सचा सहभाग होणार आहे. तसेच दोन नव्या फ्रेंचाइजींचाही समावेश आहे. २२ डिसेंबर २०१७ ते १४ जानेवारी  २०१८ दरम्यान हा खेळ रंगणार आहे. 

यंदाचं पर्व मुंबई,हैदराबाद, लखनऊ, चैन्नई, गुवाहटी अशा देशातील प्रमुख शहरात रंगणार आहे.