GT vs SRH : सनरायजर्स हैदराबादचा संघ गुजरात टायटन्सविरूद्ध आयपीएल 2024 ची 12 वी मॅच अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळत आहे. तर सनरायझर्स हैदराबादची कॅप्टन्सी ऑस्ट्रेलियाच्या पॅट कमिन्स (Pat Cummins) याच्या हाती सोपवण्यात आलीय तर गुजरात टायटन्सची कमान शुभमन गिलने (Shubhman Gill) सांभाळलेली आहे. या मॅचचा टॉस होताना पॅट कमिन्सने असं काही भाष्य केलंय, की ज्यामुळे अनेक भारतीय क्रिकेटर्स आणि भारतीय क्रिकेट फॅन्स यांच्या वनडे वर्ल्ड कपच्या (ODI World Cup 2023) कठोर आठवणी ताज्या झाल्या आहेत.
काय बोलला पॅट कमिन्स?
पॅट कमिन्सने गुजरात टायटन्सविरूद्ध टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, यानंतर जेव्हा पॅट कमिन्सला विचारलं गेलं की, या मैदानावर परत खेळताना कसं वाटतंय? तेव्हा कमिन्सने वर्ल्ड कप फायनलचं दुखणं काढलं. 'मला नेहमीच नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळायला मजा येते, मागच्या वेळी जेव्हा या ठिकाणी मी खेळलो होतो तेव्हा हे स्टेडियम खूप गजबजलेलं होतं' असं म्हणत त्याने क्रिकेट वर्ल्ड कप 2023 च्या जुन्या नकोश्या आठवणींना पुन्हा एकदा ताज्या केल्या आहेत. पॅट कमिन्सने असे बोलून भारतीय क्रिकेट टीम आणि भारतीय क्रिकेट फॅन्सला एकप्रकारे टोला सुद्धा लगावलाय, यामुळे बऱ्याच क्रिकेट फॅन्सच्या जखमेवरची खपली ही पून्हा एकदा कमिन्सने काढलेली आहे.
नेमकं काय झालं होतं?
वर्ल्ड कप 2023 ची फायनल इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात झाली होती. त्यावेळेस ऑस्ट्रेलियन संघाने कमालीचे प्रदर्शन दाखवत भारतीय संघाला एकतर्फी पराभूत केलं होतं. त्या मॅचमध्ये ऑस्ट्रेलियाकडून पॅट कमिन्स आणि ट्रॅविस हेड यांनी उत्कृष्ट प्रदर्शन करून ऑस्ट्रेलियाला वर्ल्ड कप जिंकवून दिला होता. त्यावेळेस पॅट कमिन्स बोलला होता की, 'मला एवढ्या जास्त लोकांसमोर चांगलं प्रदर्शन करायला आवडतं आणि यासोबतच दमदार प्रदर्शनाच्या जोरावर मला दुसऱ्या संघाच्या चाहत्यांना शांत करायला सुद्धा आवडतं'. त्यामुळे आता पुन्हा पॅटने भारतीय फॅन्सच्या तळपायाची आग मस्तकात गेली आहे.
गुजरात टायटन्स (प्लेइंग इलेव्हन): ऋद्धिमान साहा, शुभमन गिल (C), अजमतुल्ला ओमरझाई, डेव्हिड मिलर, विजय शंकर, राहुल तेवतिया, रशीद खान, उमेश यादव, नूर अहमद, मोहित शर्मा, दर्शन नळकांडे.
सनरायझर्स हैदराबाद (प्लेइंग इलेव्हन): मयंक अग्रवाल, ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा, एडन मार्कराम, हेनरिक क्लासेन, अब्दुल समद, शाहबाज अहमद, पॅट कमिन्स (C), भुवनेश्वर कुमार, मयंक मार्कंडे, जयदेव उनाडकट.