Navdeep Singh Emotional Story : पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारतीय खेळाडूंनी पदकांची लयलूट केली. पॅरालिम्पिकच्या इतिहासात भारताने प्रथमच 29 पदक जिंकली ज्यात 7 सुवर्ण पदकांचा समावेश होता. यापैकी एक सुवर्ण पद कमी उंचीचा भालाफेकपटू नवदीपने जॅवलिन थ्रो F41 कॅटेगरीमध्ये जिंकले. त्यानंतर नवदीप प्रसिद्धीच्या झोतात आला, पंतप्रधान मोदींनी सुद्धा त्याचे कौतुक केले. मात्र नवदीपचा इथपर्यंतचा प्रवास सोपा नव्हता. कमी उंचीमुळे लोकांचे सतत टोमणे त्याला ऐकून घ्यावे लागत होते. नवदीपने एका युट्यूब पॉडकास्टला दिलेल्या मुलाखतीत त्याची भावनिक आणि प्रेरणादायी कहाणी सांगितली.
नवदीप सिंहने मुलाखतीत खुलासा केला की त्याच्या कमी उंचीमुळे त्याला अनेकांनी आत्महत्या करण्यास सांगितले होते. कारण लोक म्हणत होते की नवदीप आयुष्यात काहीच करू शकत नाही. मुलाखतकाराने नवदीप सिंहला विचारले की, तुला काय वाटतं, तुझा प्रेरणा स्रोत काय आहे? यावर उत्तर देताना नवदीपने म्हटले की, 'तू काही करू शकत नाहीस. यापेक्षा तू आत्महत्या कर, हे काय जीवन आहे तुझं.. असं लोक मला म्हणायचे. ' , नवदीप यावेळी भावुक झालेला दिसला.
Question: Motivation कहां से मिलता है ?
Answer: #NavdeepSingh pic.twitter.com/JMkKQNKZAB— Shubhankar Mishra (@shubhankrmishra) September 13, 2024
नवदीप सिंह मुलाखती दरम्यान वडिलांच्या आठवणीने भावुक झाला. नवदीपने सांगितले की त्याचे वडील नेहमी त्याच्या सोबत उभे राहिले. कितीही संकट आली तरी जीवनात नेहमी चांगलं प्रदर्शन करण्यासाठी त्यांनी प्रेरित केले. नवदीप म्हणाला की, वडिलांनीच त्याला सुरुवात करून दिली होती. प्रत्येकवेळी वडिलांनी माझी साथ दिली. परंतु मला याची खंत वाटते की आज मी इतिहास रचला पण ते पाहण्यासाठी माझे वडील नव्हते. असं म्हणून नवदीप खूप भावुक झाल्याचे पाहायला मिळाले. पॅरालिम्पिक स्पर्धेत भालाफेकच्या फायनल राउंडमध्ये नवदीप सिंहने 46.32 मीटर भाला फेकला.
हेही वाचा : ईशान किशनसाठी पुन्हा उघडणार टीम इंडियाचे दरवाजे? 'या' सीरिजमध्ये होणार कमबॅक, शुभमनबद्दल मोठी अपडेट
नवदीप सिंह हा 24 वर्षांचा असून त्याच्या हाईटमुळे त्याला अनेकजण चिडवायचे. नवदीप हा हरियाणाचा असून तो जाट तोमर कुटुंबातून येतो. त्याचे वडील शेतकरी असून त्यांची दुधाची डेअरी सुद्धा आहेत. नवदीप सिंहची उंची केवळ 4 फूट 4 इंच असल्याने सर्वजण त्याला चिडवायचे. नवदीपचे वडील राष्ट्रीय स्तरावरील कुस्तीपटू होते. जेव्हा नवदीप 2 वर्षांचा झाला तेव्हा कळले की त्यांच्या मुलाची उंची वाढू शकत नाही. पण त्यांनी आपल्या मुलाला साथ दिली आणि नवदीपला लहानपणापासूनच ॲथलेटिक्सची आवड असल्याने त्याने भालाफेकीत करिअर करण्याचे निश्चित केले. नवदीपने 2017 मध्ये आशियाई युवा पॅरा गेम्समध्ये सुवर्णपदक जिंकून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली होती. तसेच त्याने 2021 मध्ये वर्ल्ड पॅरा ग्रँड प्रिक्समध्ये सुवर्ण तर 2024 वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदक पदकाची कमाई केली.