पांड्या आणि राहुल यांचा न्यूझीलंडमध्ये खेळण्याचा मार्ग मोकळा

...यांची चौकशी होणार

Updated: Jan 25, 2019, 11:32 AM IST
पांड्या आणि राहुल यांचा न्यूझीलंडमध्ये खेळण्याचा मार्ग मोकळा title=

मुंबई : हार्दिक पांड्या आणि के.एल. राहुल यांच्यावरील निलंबन मागे घेण्यात आले आहे. कॉफी विथ करण या कार्यक्रमात या दोघांनी महिलांचा अपमान करणारे वक्तव्य केले होते, असे प्रशासकीय समितीचा दावा होता. यामुळे पांड्या आणि के.एल राहुल यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. तसेच यांना ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून माघारी बोलवण्यात आले होते. परंतु, न्यूझीलंडमध्ये खेळण्यासाठी या दोघांना जाता येणार आहे. बीसीसीआयच्या प्रशासकीय समितीने निलंबन मागे घेऊन मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे पांड्या आणि राहुलला मोठा दिलासा मिळणार आहे. त्याचबरोबर पांड्या आणि के. एल. राहुल यांची चौकशी होणार, असे बीसीसीआयच्या प्रशासकीय समितीने सांगितले आहे. 

बीसीसीआयने हार्दिक आणि के.एल. राहुल यांच्या भविष्याबाबतचा निर्णय घेण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात विनंती केली आहे. बीसीसीआयचे अध्यक्ष सी. के. खन्ना यांनी प्रशासकीय समितीला एक पत्र लिहिले आहे. या पत्रामध्ये खन्ना यांनी हार्दिक आणि राहुल यांची बाजू घेतली होती. या पत्रात खन्ना यांनी असे लिहिले होते की, हार्दिक आणि राहुल यांच्याकडून चूक झाली. त्यामुळे त्यांनी जाहीर माफी मागितली होती. तसेच त्यांना ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून परत बोलावून घेतले होते. जो पर्यंत त्यांच्याविषयी निर्णय येत नाही. तो पर्यंत त्यांना खेळण्याची संधी द्यावी. 

 

नेमकं काय घडले ?

कॉफी विथ करण या कार्यक्रमात करण जोहर याने हार्दिक पांड्या आणि राहुल यांना काही प्रश्न विचारले होते. त्याला उत्तर देताना हार्दिक पांड्या यांने महिलेंच्या विरोधात काही वक्तव्य केले होते. त्यामुळे या दोघांना निलंबित करण्यात आले होते. 

 

करण जोहर आणि पांड्यात झालेला संवाद

 

करण जोहर - नाइट क्लबमध्ये तु मुलींचे नाव का विचारत नाही?
हार्दिक पांड्या- मला प्रत्येक मुलींचे नाव लक्षात राहत नाही. मला क्लबमध्ये गेल्यावर मुलींची नावे विचारण्यापेक्षा त्यांना चालताना निरीक्षण करायला मला जास्त आवडते. त्या कशा चालतात हे पाहण्यासाठी मी त्यांच्या मागेच उभा राहतो. 
करण जोहर- तुम्ही दोघं एकाच मुलीच्या मागे लागलात, तर त्याचा निर्णय कसा घ्याल?
लोकेश राहुल- हा निर्णय संबधित मुलगी करणार की, तिने कोणाला निवडायचे.
हार्दिक पांड्या- असे काही नाही, सर्व काही टॅलेंटवर अवलंबून असते. ज्याला मिळेल त्याने घेऊन जाव.