क्रिकेट: श्रीलंकेच्या 'त्या' खेळाडूंवर होणार कारवाई

पाकिस्तानात टी-२० खेळण्यास नकार देणाऱ्या श्रीलंकेच्या खेळाडूंना आपली मनमानी भोवण्याची शक्यता आहे. खेळाडूंच्या या हट्टीपणावरून श्रीलंका क्रिकेट बोर्ड चांगलेच संतापले असून, या खेळाडूंना मोठ्या कारवाईला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. ही कारवाई नकार देणाऱ्या खेळाडूंवर थेट एक वर्षांची टी-२० सामने खेळण्यावर बंदी घालण्याचीही असू शकते.

Annaso Chavare अण्णासाहेब चवरे | Updated: Oct 21, 2017, 04:29 PM IST
क्रिकेट: श्रीलंकेच्या 'त्या' खेळाडूंवर होणार कारवाई title=

नवी दिल्ली : पाकिस्तानात टी-२० खेळण्यास नकार देणाऱ्या श्रीलंकेच्या खेळाडूंना आपली मनमानी भोवण्याची शक्यता आहे. खेळाडूंच्या या हट्टीपणावरून श्रीलंका क्रिकेट बोर्ड चांगलेच संतापले असून, या खेळाडूंना मोठ्या कारवाईला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. ही कारवाई नकार देणाऱ्या खेळाडूंवर थेट एक वर्षांची टी-२० सामने खेळण्यावर बंदी घालण्याचीही असू शकते.

पाकिस्तानातील अंतर्गत सुरक्षेचा मुद्दा पुढे करून श्रीलंकेच्या खेलाडूंनी टी-२० सामने खेळण्यास नकार दिला होता. त्यानंतर श्रीलंका क्रिकेट प्रशासन खेळाडूंनी पाकिस्तानात टी-२० सामने खेळावेत यासाठी जोरदार प्रयत्न करत होते. प्राप्त माहितीनुसार श्रीलंका क्रिकेट बोर्डाने खेळाडूंचा हा हट्टीपणा चांगलाच गांभीर्याने घेतला असून, त्यांच्यावर कारवाई करण्याबाबत विचार सुरू केला आहे. प्रसारमाध्यमात आलेल्या बातम्यांनुसार पाकिस्तानात खेळण्यास नकार देणाऱ्या खेळाडूंविरूद्ध कारवाई म्हणून एक वर्षासाठी टी-२० खेळण्यास बंदी घालण्याचाही इशारा क्रिकेट बोर्डाने दिला आहे.

दरम्यान, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने टी-२० दरम्यान श्रीलंकन खेळाडूंना संपूर्ण सुरक्षा देण्याची हमी दिली आहे. पाकिस्तानच्या क्रिकेट बोर्डाने म्हटले आहे की, आम्ही श्रीलंकेच्या खेळाडूंना पूर्ण सुरक्षा देऊ. खेळाडूंनी सुरक्षेबाबत निश्चिंत असावे. त्यांनी कोणत्याही प्रकारे घाबरण्याचे कारण नाही, असेही पाकिस्तानने म्हटले आहे.

दरम्यान, पाकिस्तानात २००९ मध्ये क्रिकेट सामना सुरू असताना लाहोर येथे श्रीलंकेच्या संघावर दहशतवादी हल्ला झाला होता. तेव्हापासून पाकिस्तानातील आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांवर असुरक्षीतता आणि अनिश्चिततेचे ढग जमू लागले.