Sidra Ameen Shot : टीम इंडियाचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादवने (Suryakumar Yadav) त्याच्या तुफान फलंदाजीच्या जोरावर जागतिक क्रिकेटमध्ये (Cricket) स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलेलं आहे. इतर अनेक खेळाडू आहेत जे सूर्याच्या फलंदाजीची स्टाईल कॉपी करण्याचा प्रयत्न करतात. मुख्य म्हणजे या खेळाडूंमध्ये महिला खेळाडूचाही समावेश आहे.
नुकत्याच झालेल्या भारत विरुद्ध पाकिस्तान (Ind Vs Pak) महिला क्रिकेट सामन्यात याची प्रतिची आली. पाकिस्तानच्या एका खेळाडूने सूर्याच्या स्टाईलमध्ये फलंदाजी करत पाकिस्तानी खेळाडूने विकेटच्या मागे एक अजब शॉट खेळला.
12 फेब्रुवारी रोजी महिला T20 वर्ल्डकप 2023 मध्ये भारत आणि पाकिस्तान (INDW vs PAKW) यांनी त्यांचा स्पर्धेतील पहिला सामना खेळला. पाक कर्णधार बिस्माह महारूफने टॉस जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यावेळी पाकिस्तानची फलंदाज सिद्रा अमीनने (Sidra Ameen) सूर्यकुमार यादवच्या स्टाईलमध्ये शॉट खेळला. तिच्या या शॉटमुळे ती सध्या चर्चेत आहेत.
पाकिस्तान टीमच्या डावाच्या 10व्या ओव्हरमध्ये शेफाली वर्मा गोलंदाजी करत होती. यावेळी तिच्या ओव्हरच्या चौथ्या बॉलवर अमीन स्ट्राइकवर होती. या बॉलवर ती ऑफ साइडच्या दिशेने तिच्या विकेटच्या मागे गेली आणि मिड-ऑनच्या दिशेने हलकेच शॉट मारला. हा शॉट पाहून अनेक चाहत्यांना सूर्यकुमार यादवची आठवण झाली, सूर्या नेहमी असे अनोखे आणि गजब शॉट्स खेळण्यासाठी ओळखला जातो.
सूर्या इफेक्ट pic.twitter.com/sCDQHbe762
— MohiCric (@MohitKu38157375) February 12, 2023
टी-20 वर्ल्डकपमध्ये टीम इंडियाच्या महिलांनी पाकिस्तानच्या महिलांना पहिल्याच सामन्यात धुळ चारली आहे. टीम इंडियाने पाकिस्तानचा 7 विकेट्सने पराभव केला आहे. या विजयाने टी-20 वर्ल्डकपमधील पहिला सामना भारताने खिशात घातला आहे. जेमिमा रोड्रिग्सने टीम इंडियासाठी हा विजय खेचून आणला. जेमिमाने शानदार हाफ सेंच्युरी झळकावत 53 रन्सची खेळी केली आहे.
टीम इंडियाकडून जेमिमा रोड्रिग्सने सर्वाधिक 53 रन्स केले. तर शेफाली वर्माने 25 बॉल्समध्ये 33 रन्सची खेळी केली. याशिवाय रिचा घोषनेही 31 रन्स करत जेमिमाच्या मदतीने पहिल्या सामन्यात भारताला विजय मिळवून दिला.