पाकिस्तानचा अष्टपैलू खेळाडू इफ्तिखार अहमदचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हॅमिल्टन येथे न्यूझीलंडविरोधात टी-20 सामना सुरु असतानाचा हा व्हिडीओ आहे. इफ्तिखार अहमद सीमेवर क्षेत्ररक्षण करत असताना एका चाहत्याने त्याला 'चाचू' अशी हाक मारली. यामुळे इफ्तिखार अहमद चिडला आणि त्याने त्याला प्रत्युत्तर देत वाद घातला. हा सर्व प्रकार मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद झाला असून, व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
व्हायरल झालेल्या या व्हिडीओ इफ्तिखारला चाहत्याचं कृत्य अजिबात आवडलेलं नसल्याचं दिसत आहे. यावेळी चाहत्याने त्याला, मी तुझा मोठा चाहता आहे असंही म्हटलं. त्यावर इफ्तिखार अहमदने शांत राहा असं म्हटलं. त्यावर चाहताही त्याला उलट प्रश्न करत त्याच्याने काय होईल? असं उपहासात्मकपणे विचारतो. यावेळी त्याने एका आक्षेपार्ह शब्दाचाही वापर केला.
दरम्यान रविवारी झालेल्या या सामन्यात इफ्तिखार अहमद फलंदाजीतही संघर्ष करावा लागला. त्याने 8 चेंडूत फक्त 4 धावा केल्या. मालिकेच्या पहिल्या सामन्यात त्याने 227 धावांचा पाठलाग करताना 17 चेंडूत 24 धावा ठोकल्या होत्या. तत्पूर्वी, वेगवान गोलंदाज अॅडम मिल्नेने चार विकेट घेतल्याने न्यूझीलंडने रविवारी दुसऱ्या टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात पाकिस्तानचा 21 धावांनी पराभव करून मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली.
Kalesh b/w Pak Cricketer Iftikhar ahmed and a Pakistan Fan during Pak vs Nz match over calling him chachu
pic.twitter.com/n9UJakb8xY— Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) January 14, 2024
न्यूझीलंडच्या 194-8 च्या प्रत्युत्तरात पाकिस्तानचा संघ 173 धावात संपूर्ण बाद झाला. बाबर आझम आणि फखर जमान यांनी अर्धशतकं झळकावली, पण संघाला विजय मिळवून देऊ शकले नाही.
न्यूझीलंड संघ जिंकला असला तरी केन विल्यमसन जखमी झाल्याने त्यांची चिंता वाढली आहे. पुढील पाच सामन्यांच्या मालिकेत तो खेळणार की नाही याबाबत शंका आहे. पाकिस्तानचा कर्णधार शाहीन आफ्रिदीने हॅमिल्टनमध्ये गोलंदाजांनी काही अतिरिक्त धावा धावा दिल्याचं मान्य केलं.
“प्रामाणिकपणे सांगायचं तर प्रथम गोलंदाजी करणं नेहमीच अवघड असतं. तुम्ही विकेट मिळवण्यासाठी स्विंग करण्याचा प्रयत्न करू शकता, पण आम्हाला काही मिळाले नाही. जर आम्हाला लवकर विकेट मिळाल्या असत्या तर आम्ही त्यांना जवळपास 170 पर्यंत रोखू शखलो असको. मला वाटतं की आम्ही बॉलने जोरदार पुनरागमन केले, हरिस आणि अब्बास यांनी खरोखरच चांगली गोलंदाजी केली, अगदी उसामा मीर देखील,” असं शाहीनने सामन्यानंतरच्या पत्रकार परिषदेत सांगितले.