मुंबई : पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरच्या अडचणी वाढण्याच्या शक्यता आहे. पाकिस्तान टेलिव्हिजन कॉर्पोरेशन (पीटीव्ही) ने शोएब अख्तरला 100 दशलक्ष (रु. 10 कोटी) मानहानीची नोटीस पाठवली आहे, असे म्हटले आहे की, त्यांनी गेल्या महिन्यात PTV स्पोर्टसमधून ऑन-एअर राजीनामा दिला होता, ज्यामुळे त्यांच्यातील कराराचे उल्लंघन झाले. तसेच यामुळे पीटीव्हीचेही मोठे नुकसान झाले आहे. पीटीव्हीची नोटीस आल्यानंतर कायदेशीर लढाई लढण्याची घोषणा करण्यात आली आहे.
शोएब अख्तरने ट्विट करून यासंदर्भात माहिती दिली. ट्वीटवर शोएबने लिहिले की, "मी पूर्णपणे निराश आहे. मी पीटीव्हीसाठी काम करत असताना माझा सन्मान आणि प्रतिष्ठेचे रक्षण करण्यात अत्यंत अपयशी ठरल्यानंतर, त्यांनी आता मला रिकव्हरी नोटीस पाठवली आहे. मी एक फायटर आहे, मी हार मानणार नाही आणि ही कायदेशीर लढाई लढणार आहे. कायद्यानुसार आम्ही हा लढा सुरू ठेवू."
एआरवाय न्यूजनुसार, पीटीव्हीने शोएबला पाठवलेल्या नोटीसमध्ये म्हटले आहे की, “कराराच्या क्लॉज-22 नुसार, दोन्ही पक्षांना 3 महिन्यांची लेखी नोटीस देऊन किंवा त्याऐवजी पैसे देऊन त्यांचा करार संपुष्टात आणण्याचा अधिकार असेल. तर शोएब अख्तरने 26 ऑक्टोबर रोजी ऑन एअर राजीनामा दिला होता. यामुळे पीटीव्हीचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे."
नोटीसमध्ये पुढे म्हटले आहे की, 'शोएबने T20 वर्ल्ड कपच्या प्रसारणादरम्यान PTVC व्यवस्थापनाला कोणतीही पूर्व सूचना न देता दुबई सोडली. याशिवाय, भारतीय क्रिकेटर एका भारतीय टीव्ही शोमध्ये हरभजन सिंगसोबत थेट चर्चा करत राहिला. यामुळे पीटीव्हीचेही नुकसान झाले.'
अख्तर यांना तीन महिन्यांचा पगार द्यावा लागणार आहे
अख्तरला PTVC ने नुकसानभरपाई म्हणून 100 दशलक्ष रुपये तसेच 3333000 रुपये, जे PTV च्या तीन महिन्यांच्या पगाराच्या बरोबरीने भरण्यास सांगितले गेले आहे. अख्तर यांनी तसे न केल्यास, पीटीव्हीने त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई सुरू करण्याचा अधिकार राखून ठेवला आहे.
शोएब अख्तर गेल्या महिन्यात पीटीव्हीच्या स्पोर्ट्स शोमध्ये टी-20 संदर्भात चर्चेत सहभागी झाला होता. या शोचे अँकर डॉ नौमन नियाज होते. यादरम्यान अँकरने हे म्हंटले, ज्यावर शोएब अख्तर नाराज झाला आणि त्याने ऑन एअर, शो सुरू असताना राजीनामा देण्याची घोषणा केली.
पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यातील सामन्याची चर्चा सुरू असतानाच दोघांमध्ये वाद सुरू झाला. शोएबच्या चर्चेदरम्यान हरिस रौफ आणि शाहीन शाह आफ्रिदीबद्दल आपापले युक्तिवाद करत होते. दरम्यान, डॉ. नौमानने अख्तरला सांगितले की, तू खूप स्मार्ट होत आहेस, त्यामुळे तुला पाहिजे तर तु जाऊ शकतोस. त्यावेळी शोएबने अँकरला सांगितले की, मी तुमच्याविरोधात काहीही बोलत नाही. क्रिकेटबद्दलच बोलत होते. हा मुद्दा इथेच संपुया. मात्र त्यानंतर अचानक त्याने लाइव्ह शोमध्येच आपला राजीनामा जाहीर केला.
तो म्हणाला की नॅशनल टीव्हीवर माझ्याशी ज्या पद्धतीने वागले. मी PTV वरून रेजाइन करत आहे. त्यानंतर त्याने तो शो सोडला.
Dr Nauman Niaz and Shoaib Akhtar had a harsh exchange of words during live PTV transmission. pic.twitter.com/nE0OhhtjIm
— Kamran Malik (@Kamran_KIMS) October 26, 2021
शोएब अख्तरने पाकिस्तानसाठी 46 कसोटीत 3.37 च्या सरासरीने 178 विकेट्स आणि 163 एकदिवसीय सामन्यांमध्ये 4.76 च्या सरासरीने 247 बळी घेतले आहेत.