Live सामन्यादरम्यान खेळाडूची तब्येत खालावली; रूग्णालयात केलं दाखल

पुढील तपासासाठी त्याला रुग्णालयात नेण्यात आले. 

Updated: Oct 1, 2022, 12:14 PM IST
Live सामन्यादरम्यान खेळाडूची तब्येत खालावली; रूग्णालयात केलं दाखल title=

मुंबई : पाकिस्तानच्या टीमवर नामुष्की आली आहे. इंग्लंडविरुद्धच्या सहाव्या टी-20 सामन्यादरम्यान पाकिस्तानी खेळाडूची प्रकृती इतकी बिघडली की, त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पाकिस्तानचा स्टार खेळाडू हैदर अलीची प्रकृती आधीच खराब होती. सामन्यादरम्यान त्यांची प्रकृती खालावली. त्याला व्हायरलचा त्रास झाला असून पुढील तपासासाठी त्याला रुग्णालयात नेण्यात आले. 

मिळालेल्या माहितीनुसार, हैदर अलीला रात्रभर रुग्णालयात राहण्याचा सल्ला देण्यात आला होता. सहाव्या सामन्यात हैदरला केवळ 18 रन्स करता आले होते.

या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने निर्धारित 6 ओव्हरमध्ये 169 रन्स केले. प्रत्युत्तरात इंग्लंडने 170 रन्सचं लक्ष्य 33 चेंडूत 2 विकेट्स गमावून पूर्ण केले. यासह इंग्लंडने 7 सामन्यांच्या मालिकेत 3-3 अशी बरोबरी साधली आहे.

नसीमनंतर हैदरही आजारी 

हैदर अलीशिवाय नसीम शाह याचीही तब्येत बिघडल्याची माहिती आहे. नसीमला कोरोना झाला असून त्यामुळे तो इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतून बाहेर पडला आहे. त्यांना यापूर्वी न्यूमोनिया झाला होता. त्यातून तो सावरत असतानाच त्याला कोरोनाची लागण झाली.

सॉल्टने पाकिस्तानी गोलंदाजांना हैराण केले

इंग्लिश सलामीवीर फिल सॉल्टने पाकिस्तानी गोलंदाजांना चोप देत 41 चेंडूत नाबाद 88 रन्स केले. त्याने आपल्या खेळीत 13 चौकार आणि 3 सिक्स मारले. पाकिस्तानकडून कर्णधार बाबर आझमने सर्वाधिक 87 रन्स केले. त्याने 59 चेंडूत 7 चौकार आणि 3 सिक्स ठोकले.